वर्गणीच्या नावाखाली खंडणी; अहमदपूर येथे दाेघाविराेधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 06:08 PM2021-09-05T18:08:45+5:302021-09-05T18:08:49+5:30

Crime News : पाेलीस काेठडी : लातूर-नांदेड मार्गावरील राळगा पाटी येथील घटना

Ransom in the name of contribution; Crime against duo at Ahmedpur | वर्गणीच्या नावाखाली खंडणी; अहमदपूर येथे दाेघाविराेधात गुन्हा

वर्गणीच्या नावाखाली खंडणी; अहमदपूर येथे दाेघाविराेधात गुन्हा

googlenewsNext
ठळक मुद्देपाेलिसांनी सांगितले, लातूर-नांदेड महामार्गावर राळगा पाटी येथे दाेघे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना अडवून वर्गणीच्या नावाखाली जबरदस्तीने पैसे मागत असल्याची माहिती अहमदपूर येथील पाेलिसांना मिळाली. crime

लातूर/अहमदपूर : जिल्ह्यातील लातूर-नांदेड महामार्गावरील राळगा पाटी येथे वाहनांना अडवून जबरदस्तीने वर्गणी गाेळा करणाऱ्या दाेघांना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अहमदपूर पाेलीस ठाण्यात खंडणीचा रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अहमदपूर येथील न्यायालयात हजर केले असता, एक दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे. 

पाेलिसांनी सांगितले, लातूर-नांदेड महामार्गावर राळगा पाटी येथे दाेघे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना अडवून वर्गणीच्या नावाखाली जबरदस्तीने पैसे मागत असल्याची माहिती अहमदपूर येथील पाेलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सहायक पाेलीस निरीक्षक आर.एच. केदार यांनी पाेलीस कर्मचाऱ्यांसह राळगापाटी येथे शनिवार, ४ सप्टेंबर राेजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास छापा मारला. दरम्यान, दाेघांना ताब्यात घेत अधिक चाैकशी केली असता, वर्गणीच्या नावाखाली वाहनधारकांकडून जबरदस्तीने पैसे घेत असल्याचे आढळून आले. याबाबत अहमदपूर पाेलीस ठाण्यात पाेलीस अंमलदार लक्ष्मण आरदवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नागनाथ बापूराव देवकत्ते (३० रा. राळगापाटी ता. अहमदूपर) आणि अन्य एक अल्पवयीन मुलाविराेधात गुरनं. ३९३ / २०२१ कलम ३४१, ३८४, ३४ भादंविप्रमाणे रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील नागनाथ देवकत्ते याला अहमदपूर येथील न्यायालया हजर केले असता, एक दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली आहे. तर दुसऱ्या अल्पवयीन मुलाला नाेटीस देवून साेडून देण्यात आले आहे. अधिक तपास पाेलीस अंमलदार केंद्रे करीत आहेत.

Web Title: Ransom in the name of contribution; Crime against duo at Ahmedpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.