‘न्यूड’मुळे रणवीर अडचणीत, ‘सिम्बा’विरोधात पोलिसांत तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 07:58 AM2022-07-26T07:58:31+5:302022-07-26T07:59:16+5:30

‘सिम्बा’विरोधात पोलिसांत तक्रार

Ranveer in trouble due to 'Nude', police complaint against 'Simba' | ‘न्यूड’मुळे रणवीर अडचणीत, ‘सिम्बा’विरोधात पोलिसांत तक्रार

‘न्यूड’मुळे रणवीर अडचणीत, ‘सिम्बा’विरोधात पोलिसांत तक्रार

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आपल्या अतरंगी स्टाइल आणि चित्रविचित्र कपड्यांच्या फॅशनमुळे सतत चर्चेत राहणारा, मोठ्या पडद्यावर ‘लार्जर दॅन लाइफ’ भूमिका साकारणारा प्रख्यात अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे बराच गाजत आहे. मात्र, याच फोटोशूटमुळे तो अडचणीत आला असून, त्याच्याविरोधात चेंबूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका मासिकासाठी रणवीरने हे निर्वस्त्र छायाचित्र दिले आहे.  रणवीर सिंगने अलीकडेच न्यूड फोटोशूट केले. त्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू झाली.

रणवीरच्या बॉलिवूडमधील तमाम सहकाऱ्यांनी त्याच्या या बोल्ड अंदाजाबद्दल कौतुक केले. तर अनेकांनी नाके मुरडली. रणवीरच्या या फोटोशूटवरून भन्नाट मिम्सही व्हायरल होत आहेत. मात्र, रणवीरच्या या कृत्यामुळे समस्त महिला वर्गाच्या भावना दुखावल्याची तक्रार सोमवारी चेंबूर पोलीस ठाण्यात करण्यात आली. वेदिका चौबे नावाच्या महिलेने ही तक्रार दाखल केली असून, रणवीरवर कारवाईची मागणीही केली आहे. वेदिका यांनी केलेल्या तक्रारीत रणवीरच्या फोटोमुळे महिलांच्या भावना दुखावल्याचा आणि भारतीय संस्कृतीला धक्का पोहोचवल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. 

लोक माझ्याबद्दल काय बोलतात, यामुळे मला अजिबात फरक पडत नाही. मला जे कपडे आवडतात ते मी घालतो. मला जे आवडतं ते मी खातो. जर ही गोष्ट एखाद्याला आवडत नसेल तर त्यासाठी मी काहीच करू शकत नाही.

Web Title: Ranveer in trouble due to 'Nude', police complaint against 'Simba'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.