Ranya Rao: युट्यूबवरुन शिकली सोनं लपवण्याची पद्धत; तस्करीची पहिलीच वेळ, रान्या रावचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 11:08 IST2025-03-13T11:07:59+5:302025-03-13T11:08:25+5:30
Ranya Rao Gold Smuggling Case: सोने तस्करी प्रकरणात अडकलेली अभिनेत्री रान्या राव हिने मोठा खुलासा केला आहे. मी

Ranya Rao: युट्यूबवरुन शिकली सोनं लपवण्याची पद्धत; तस्करीची पहिलीच वेळ, रान्या रावचा मोठा खुलासा
Gold Smuggling Case: सोने तस्करी प्रकरणात अडकलेली अभिनेत्री रान्या राव (Ranya Rao) हिने मोठा खुलासा केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रान्या रावने सांगितलं आहे की, तिने पहिल्यांदाच सोन्याची तस्करी केली होती आणि सोने लपवण्याची ही पद्धत तिने युट्यूबवरून शिकली होती. रान्याने महसूल गुप्तचर संचालनालयाला (DRI) दिलेल्या निवेदनात ही माहिती दिल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी अभिनेत्रीने तिच्या वारंवार होणाऱ्या परदेश दौऱ्यांबद्दल आणि सोन्याच्या तस्करीबद्दल सांगितलं.
रिपोर्टनुसार, दुबईतून सोन्याची तस्करी करण्याची तिची ही पहिलीच वेळ होती. तसेच तिने यापूर्वी कधीही दुबईहूनसोनं खरेदी केलं नव्हतं. दुबईहून बंगळुरूला सोनं तस्करी करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती असं म्हटलं आहे.
परदेशी नंबरवरुन यायचे कॉल
डीआरआय अधिकाऱ्यांना रान्याने सांगितलं की, गेल्या दोन आठवड्यांपासून तिला परदेशी नंबरवरुन कॉल येत होते. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, "मला १ मार्च रोजी एका परदेशी फोन नंबरवरून फोन आला. मला दुबई एअरपोर्टच्या टर्मिनल ३ च्या गेट ए वर जाण्याची सूचना देण्यात आली होती. मला दुबई एअरपोर्टवरून सोनं घेऊन बंगळुरूमध्ये त्याच्याकडे सोपवण्यास सांगण्यात आलं."
महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ३ मार्च रोजी केम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्टवर रान्याकडून १२.५६ कोटी रुपयांचे सोन्याचे बार जप्त केले होते. २.०६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २.६७ कोटी रुपयांचे भारतीय चलनही जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं.
आधी गोल्ड स्मगलिंग आता लँड गिफ्ट... रान्या रावच्या पॉलिटिकल कनेक्शनबद्दल धक्कादायक खुलासा
अभिनेत्रीचे कर्नाटकच्या राजकारणात चांगले संबंध होते असं तपासात दिसून आलं आहे. कर्नाटक सरकारने रान्या रावची कंपनी KSIRODA इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला १२ एकर जमीन दिली होती KIADB (कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळ) ने २०२३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या कार्यकाळात कंपनीची डायरेक्टर हर्षवर्धनी राम्याच्या नावावर ही जमीन दिली होती. या खुलाशामुळे एका अभिनेत्रीच्या कंपनीने इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारी जमीन कशी मिळवली याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.