बलात्कार, गर्भपात, धमकी! भाजपाच्या पदाधिकाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 09:37 PM2022-09-21T21:37:39+5:302022-09-21T21:37:55+5:30
२५ वर्षीय पीडित महिलेच्या फिर्यादी वरून १४ सप्टेंबर रोजी भाजपाच्या सृष्टी मंडळ चा पदाधीकारी असलेल्या नवीन सिंह याच्यावर काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता .
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - बलात्कार , गर्भपात, धमकावणे व माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमां खाली गुन्हा दाखल झाल्यावर फरार असलेला भाजपाचा पदाधिकारी नवीन सिंह ह्याला काशीमीरा पोलिसांनी पालघरच्या चारोटी येथून अटक केली आहे . ठाणे न्यायालयाने बुधवारी त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे .
२५ वर्षीय पीडित महिलेच्या फिर्यादी वरून १४ सप्टेंबर रोजी भाजपाच्या सृष्टी मंडळ चा पदाधीकारी असलेल्या नवीन सिंह याच्यावर काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता . पती पासून मुलीसह वेगळी राहणाऱ्या पीडितेला नवीन याने त्याच्या कार्यालयात कामास ठेवले तसेच रहायला फ्लॅट दिला. मुलीची व तिची जबाबदारी घेतो सांगितले . त्यातूनच दोघां चे शारीरिक संबंध झाले .
ती गरोदर राहिली असता बळजबरी गर्भपात त्याने करायला लावला . नगरसेवकांच्या निवडणुकी नंतर लग्न करू असे आश्वासन दिले असले तरी तो इच्छे विरुद्ध बळजबरी करायचा. अन्य महिले वरून दोघात वाद झाला होता . तिचे विवस्त्र अवस्थेतील छायाचित्र तिच्या परिचितास पाठवून ते समाज माध्यमांवर व्हायरल करायची धमकी त्याने दिली . गुन्हा दाखल झाल्या नंतर नवीन हा पसार झाला होता . काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथके नवीन याचा शोध घेत होती .
नवीन हा सुरतला असल्याचे व तेथून तो पालघर येथे येणार असल्याचे पोलिसांना समजले . पोलिसांनी मंगळवारी रात्री माहितीच्या आधारे नवीन ह्याला चारोटी भागातील एका पेट्रोल पंपच्या आवारातून त्याला अटक केली . त्या भागात गाडीतच तो झोपला होता . बुधवारी त्याला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले अशी माहिती हजारे यांनी दिली .