वणीच्या डॉक्टरविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 12:13 AM2020-07-03T00:13:44+5:302020-07-03T00:16:06+5:30

ओळखीनंतर लग्नासाठी तगादा लावणाऱ्या डॉक्टर पतीने लग्नानंतर मात्र अनैसर्गिक अत्याचार करून अनन्वित छळ केला. जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. पतीकडून होणारा छळ असह्य झाल्याने डॉक्टर पत्नीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

Rape case against Wani doctor | वणीच्या डॉक्टरविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

वणीच्या डॉक्टरविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

Next
ठळक मुद्देअनैसर्गिक अत्याचार : अनन्वित छळ, डॉक्टर पत्नीची पोलिसांकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ओळखीनंतर लग्नासाठी तगादा लावणाऱ्या डॉक्टर पतीने लग्नानंतर मात्र अनैसर्गिक अत्याचार करून अनन्वित छळ केला. जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. पतीकडून होणारा छळ असह्य झाल्याने डॉक्टर पत्नीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. उपलब्ध पुराव्याच्या आधारे बेलतरोडी पोलिसांनी वणी (जि. यवतमाळ) येथील डॉ. शिरीष निवृत्तीनाथ मांडेकर (वय ४५) विरुद्ध बलात्कार (अनैसर्गिक) आणि छळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली अनुसुचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या घडामोडीमुळे वैद्यकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.
डॉ. मांडेकर वणी (जि. यवतमाळ) येथील मणिप्रभा टॉवरमध्ये राहतो. पीडित डॉक्टर पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, डॉ. मांडेकर आणि तक्रार करणारी महिला वर्धा जिल्ह्यातील सावंगी (मेघे) येथील मेडिकल कॉलेजमध्ये शिकायचे. सिनियर असलेला मांडेकर यावेळी नेहमी सलगी साधण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे त्यांचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर मांडेकरने लग्नासाठी तगादा लावला. प्रारंभी जातपात मानत नाही, माझ्या घरच्यांनाही काही अडचण नाही, कोणताही हुंडा नको, असे सांगणाऱ्या मांडेकरने लग्न जुळविले. लग्नपत्रिका वाटल्यानंतर लग्नाच्या १० दिवसापूर्वी ५० तोळे सोने हवे आणि रिसेप्शन महागड्या हॉटेलमध्ये हवे, अशी अट घातली. जुळवाजुळव करून २५ तोळे सोने आणि हॉटेलमध्ये रिसेप्शन पार पडले. त्यानंतर मांडेकर पत्नीवर अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी दडपण आणू लागला. त्याला पत्नी विरोध करीत असल्यामुळे डॉ. मांडेकर पत्नीला २५ तोळे सोने हवे, असे म्हणून जातीवाचक तसेच अश्लील शिवीगाळ करू लागला. दरम्यान, त्या गर्भवती झाल्याने माहेरी आल्या असता मांडेकरने कोणतीही काळजी घेतली नाही अन् कर्तव्य पूर्ण केले नाही. चिमुकला मुलगा अन् आईसह पत्नी वणी येथे गेली असता तेथे तिला आक्षेपार्ह वस्तू आणि महिलांचे केस दिसले. त्याबाबत विचारणा केली असता डॉ. मांडेकरने पत्नीला मारहाण करून सासूला शिवीगाळ केली. त्यानंतर पती-पत्नीतील वाद वाढतच गेला. डॉ. मांडेकरने मुलाचे शिक्षण नागपुरात करण्याच्या बहाण्याने पत्नीला मुलासह नागपुरात राहण्यास बाध्य केले.

अखेर भंडाफोड
काही दिवसापूर्वी पीडित महिलेला तिच्या शेजाऱ्यांचे फोन येऊ लागले. तुझ्या नवऱ्याकडून वेगवेगळ्या महिला आणल्या जातात. अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली. त्यामुळे पत्नीने वणीला धाव घेतली अन् पती घराबाहेर असताना घरात कॅमेरे लावून घेतले. काही दिवसांनंतर पत्नीवणी येथे गेले आणि तिने कॅमेराचे एसडी कार्ड काढून बघितले असता पत्नीला धक्काच बसला. त्यात पती वेगवेगळ्या महिलांसोबत नको त्या अवस्थेत दिसल्याने पीडित महिला हादरली. पतीच्या कुकृत्याचा भंडाफोड झाल्यानंतर आणि त्याच्याकडून होत असलेला त्रास लक्षात घेत अखेर पीडित डॉक्टर पत्नीने बुधवारी बेलतरोडी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी बलात्कार तसेच हुंड्यासाठी मारहाण करून छळ करण्याच्या आरोपाखाली गुरुवारी डॉ. मांडेकरविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Rape case against Wani doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.