मुलीवर बलात्कार, सोशल मीडियावर व्हिडिओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 05:09 AM2021-03-02T05:09:34+5:302021-03-02T05:09:40+5:30
उत्तर प्रदेशातील चित्रकूटमधील रायपूरमध्ये एका सातवर्षीय मुलीवर किशोरवयीन मुलाने बलात्कार केला. बारावीतील मुलगा या मुलीला घरून घेऊन गेला.
बलिया : एका किशोरवयीन मुलीवर बलात्कार आणि सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. चंद्रमा राजभर (२४) याला अटक करण्यात आली असून, एका १७ वर्षीय मुलीवर तो एक वर्षापासून बलात्कार करत होता.
या आरोपीने व्हिडिओ करून फेसबुकवरही शेअर केले. आरोपीवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलीने तक्रारीत म्हटले आहे की, आरोपीने अनेकदा अत्याचार केला आणि काही बोलल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकी दिली.
सात वर्षीय मुलीवर बलात्कार
उत्तर प्रदेशातील चित्रकूटमधील रायपूरमध्ये एका सातवर्षीय मुलीवर किशोरवयीन मुलाने बलात्कार केला. बारावीतील मुलगा या मुलीला घरून घेऊन गेला.
दलित मुलीचा मृतदेह आढळला
उत्तर प्रदेशातील अलिगढमध्ये एका १६ वर्षीय दलित मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर तणाव निर्माण झाला आहे. संतप्त गावकरी रस्त्यावर उतरले असून, पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. ही मुलगी रविवारी शेतात गेली होती. मात्र, परत न आल्याने शोधाशोध केली असता तिचा मृतदेह शेतात आढळून आला. तिचा गळा दाबून खून केल्याचे दिसून येत आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी दगडफेक केली. यात पोलीस निरीक्षक प्रणेंद्र कुमार जखमी झाले.