फिल्मी स्टाईलने मुलीच्या भांगेत भरले कुंकू; शारीरिक संबंधानंतर केली फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 02:08 PM2022-02-12T14:08:55+5:302022-02-12T14:50:04+5:30
Crime News : पोलिसांनी सांगितले की, दोघे कॉलेजमध्ये भेटले होते आणि त्यांचे प्रेमसंबंध होते.
लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये बलात्काराची घटना समोर आली आहे. येथील एका प्रियकराने लग्नाच्या बहाण्याने प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिला सोडून पळून गेला. याप्रकरणी प्रेयसीने तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अद्याप आरोपी प्रियकराला अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी सांगितले की, दोघे कॉलेजमध्ये भेटले होते आणि त्यांचे प्रेमसंबंध होते.
आरोपी मुलाने आधी मुलीला प्रपोज केले, त्यानंतर दोघांची भेट होत होती. यादरम्यान मुलाने तिला अनेकवेळा लग्नाचे आश्वासनही दिले होते, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पीडित मुलीने आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितले की, पंडित आणि कुटुंबीयांना न जुमानता आरोपी मुलाने तिला आपल्या विश्वासात घेण्यासाठी मंदिरात जाऊन तिच्या भांगेत कुंकू भरले होते. त्यानंतर गेल्या दीड वर्षांपासून तो तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता.
याशिवाय, आरोपीने तिच्याकडे अनेकवेळा पैशांची मागणी केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. आधी 10 हजार नंतर 30 हजार मागितले. मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवून पैसेही दिले. यानंतर आरोपी तिच्यापासून दूर लांब राहण्याचा प्रयत्न करू लागला. तसेच, आरोपीने पीडितेला सांगितले की, कुटुंबाच्या विरोधात जाऊन मी लग्न करू शकत नाही. या घटनेनंतर पीडितेने पोलिसांत गुन्हा दाखल केला.
दरम्यान, डेप्युटी एसपी नबेला शुक्ला यांनी सांगितले की, पीडितेचा अर्ज आला होता. तिने एका संस्थेत शिक्षण घेतले होते. त्याठिकाणी तिची एका मुलाशी भेट झाली, त्यानंतर दोघेही प्रेमात पडले. मुलाने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि लग्नाचे खोटे आश्वासन देत राहिल्याचा आरोप मुलीने केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून भादंवि कलम 376 आणि कलम 406 च्या गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.