सोशल मीडियावरील ओळखीचा फायदा घेऊन विवाहितेवर अत्याचार 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 06:33 PM2019-07-13T18:33:01+5:302019-07-13T18:34:35+5:30

नवऱ्याने सोडल्यावर तुझ्याशी लग्न करीन,असे आमिष दाखवून आरोपीने विवाहितेच्या इच्छेविरूध्द जबरदस्ती करून अत्याचार केला.

rape on Marriaged women by taking advantage identity on social media | सोशल मीडियावरील ओळखीचा फायदा घेऊन विवाहितेवर अत्याचार 

सोशल मीडियावरील ओळखीचा फायदा घेऊन विवाहितेवर अत्याचार 

Next

पिंपरी : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन विवाहितेवर अत्याचार केला. तसेच सोशल मीडियावर फोटो टाकून विवाहितेची बदनामी केली. भोसरी येथे दि. २२ मार्च रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बादशहा उर्फ रतीन गुप्ता (रा. सतनाम, उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २७ वर्षीय पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. आरोपी गुप्ता याने फिर्यादी विवाहितेशी सोशल मीडियावरून ओळख केली. त्याचा फायदा घेऊन जवळीक साधून दि. २२ मार्च रोजी आरोपी गुप्ता विवाहितेच्या घरी आला. त्यावेळी आरोपी गुप्ता विवाहितेच्या घरी मुक्कामी थांबला. नवऱ्याने सोडल्यावर तुझ्याशी लग्न करीन,असे आमिष दाखवून आरोपी गुप्ता याने विवाहितेच्या इच्छेविरूध्द जबरदस्ती करून विवाहितेवर अत्याचार केला. तसेच विवाहितेचे व दोघांनी एकत्र काढलेले फोटो विवाहितेच्या पतीला व्हॉटसअँपवरून पाठविले. तसेच सोशल मीडियावर फोटो अपलोड करून विवाहितेची बदनामी केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: rape on Marriaged women by taking advantage identity on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.