नात्याला काळीमा! भावानेच केला 5 वर्षांच्या बहिणीवर बलात्कार; CCTV फुटेजमधून धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 04:52 PM2021-01-20T16:52:57+5:302021-01-20T17:05:33+5:30

Crime News : बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे.

rape minor year old girl cousin sister cctv police fatehabad haryana | नात्याला काळीमा! भावानेच केला 5 वर्षांच्या बहिणीवर बलात्कार; CCTV फुटेजमधून धक्कादायक खुलासा

नात्याला काळीमा! भावानेच केला 5 वर्षांच्या बहिणीवर बलात्कार; CCTV फुटेजमधून धक्कादायक खुलासा

googlenewsNext

नवी दिली - देशात बलात्काराच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. याच दरम्यान बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. हरियाणाच्या फतेहाबादमध्ये एक लज्जास्पद घटना घडली आहे. भावानेच 5 वर्षांच्या बहिणीवर बलात्कार केला आहे. CCTV फुटेजमधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चिमुकलीच्या वडिलांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून पोलीस याचा अधिक तपास करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 वर्षीय तरूण आपल्या आत्याच्या घरी 15 दिवसांसाठी राहायला आला होता. 

तरुणाने याच दरम्यान आपल्या आत्याच्या मुलीवर बलात्कार केला आहे. मुलीने आपल्या कुटुंबीयांना तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला. त्यावेळी वडिलांनी त्यांच्या घरामध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचं फुटेज चेक केलं. फुटेज पाहून सर्वांनाच धक्का बसला आणि बलात्काराची ही भयंकर घटना समोर आली आहे. यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार दाखल केली  आहे. तरुण मोटार मेकॅनिकचं काम शिकण्यासाठी सिरसा येथून फतेहाबादमध्ये आल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

बलात्काराचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर तरुण फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. लवकरच या आरोपीला अटक करू अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे. अशीच एक धक्कादायक घटना केरळमध्ये घडली आहे. एका 17 वर्षाच्या मुलीवर तब्बल 44 जणांनी बलात्कार केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. निर्भया केंद्रावर सुरू असलेल्या काऊन्सिलींगदरम्यान मुलीने आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराचा धक्कादायक खुलासा केला आहे. खळबळजनक बाब म्हणजे यापैकी कित्येक आरोपी हे मोकाट फिरत असून त्यांना अटक करण्यात आलेली नाही. 

17 वर्षीय मुलीवर तब्बल 44 जणांनी केला बलात्कार; 24 आरोपी अद्याप मोकाट

अल्पवयीन मुलीने निर्भया केंद्रावर काऊन्सिलिंगदरम्यान या भयंकर प्रकाराची माहिती दिली आहे. केरळमधील मलप्पूरम जिल्ह्यातील पल्लकडमध्ये एका 17 वर्षीय मुलीवर बलात्कार आणि छेडछाडीच्या आरोपाखाली 44 पुरुषांविरोधात 32 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यापैकी आतापर्यंत फक्त 20 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 24 जणांचा शोध सुरू आहे. ज्या लोकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यामध्ये अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय आरोपींपैकी अनेक जण न्यायालयीन अटकेत आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे.

Web Title: rape minor year old girl cousin sister cctv police fatehabad haryana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.