लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; घेतले १० लाख व सोन्याची चेन
By धीरज परब | Updated: October 18, 2023 17:54 IST2023-10-18T17:54:45+5:302023-10-18T17:54:56+5:30
पीडिता ही २७ वर्षांची असून २०२० मध्ये तिची ओळख भिवंडीच्या पडघा भागातील मुखलीस अन्वर कुंगले याच्याशी झाली होती.

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; घेतले १० लाख व सोन्याची चेन
मीरारोड - आधी लग्न झालेले असताना तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून अनेकवेळा बळजबरीने बलात्कार करून तिचे १० लाख रोख आणि सोन्याची चैन घेऊन तिची फसवणूक केल्या प्रकरणी काशीमीरा पोलिसांनी दाखल गुन्ह्याचा तपास चालवला आहे.
पीडिता ही २७ वर्षांची असून २०२० मध्ये तिची ओळख भिवंडीच्या पडघा भागातील मुखलीस अन्वर कुंगले याच्याशी झाली होती. मुखलीस याने लग्न करण्याचे आमिष दाखवून विविध लॉजमध्ये नेऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. नंतर तिला घोडबंदर मार्गावर एका फ्लॅटमध्ये ठेवलं व तिथे सुद्धा अनेकवेळा तिच्या इच्छे विरुद्ध शारीरिक व अनैसर्गिक संबंध ठेवले.
तिच्या कडून वेळोवेळी असे एकूण १० लाख रुपये व सोन्याची चैन उकळली. मुखलीस याचे आधीच लग्न झाल्याचे तरुणीस समजले. या प्रकरणी तिने कासारवडवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो काशीमीरा पोलिसांकडे वर्ग केला. मंगळवारी रात्री पोलिसांनी गुन्हा नोंद करून उपनिरीक्षक साठे यांच्याकडे तपास दिला आहे.