सहा वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्यास अटक
By जितेंद्र कालेकर | Updated: June 5, 2023 22:37 IST2023-06-05T22:36:50+5:302023-06-05T22:37:21+5:30
यशस्वीनगर भागातील ही पीडित मुलगी सायंकाळी ४.३० च्या सुमारास रडताना काही नागरिकांना दिसली.

सहा वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्यास अटक
ठाणे : ठाण्यातील यशस्वीनगरातील सहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मूळच्या पश्चिम बंगालच्या ५५ वर्षीय आराेपीला अटक केल्याची माहिती कापूरबावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम सोनवणे यांनी सोमवारी दिली.
यशस्वीनगर भागातील ही पीडित मुलगी सायंकाळी ४.३० च्या सुमारास रडताना काही नागरिकांना दिसली. तिचा रक्तस्राव होत असल्याचे आढळल्यानंतर तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा हा घृणास्पद प्रकार उघड झाला. या घटनेनंतर पळून जाण्याच्या बेतात असलेल्या यातील आरोपीला पकडण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले.