रुळावर चालत घराकडे परतणाऱ्या महिलेवर बलात्कार; टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळील धक्कादायक घटना

By मुरलीधर भवार | Published: November 14, 2023 04:01 PM2023-11-14T16:01:52+5:302023-11-14T16:02:07+5:30

रेल्वे रुळालगत झुडपात केला बलात्कार; कल्याण रेल्वे पोलिसांनी नराधमाला ठोकल्या बेड्या

Rape of woman returning home walking on track; Shocking incident near Titwala railway station | रुळावर चालत घराकडे परतणाऱ्या महिलेवर बलात्कार; टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळील धक्कादायक घटना

रुळावर चालत घराकडे परतणाऱ्या महिलेवर बलात्कार; टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळील धक्कादायक घटना

कल्याण - टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळधक्कादायक घटना समोर आलीय .  महिला प्रवासी लोकलने उतरून आपल्या घरी जात असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला . टिटवाळा रेल्वे स्थानकालगत असलेल्या अरुणा शेजारील  झुडपात हा प्रकार घडला . याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रेल्वे पोलिसांनी नराधम निशांत चव्हाण याला अटक केली आहे . या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे

 सोमवारी संध्याकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पीडित महिला शहाड रेल्वे स्थानकावरून लोकलने टिटवाळा रेल्वे स्थानकात आली . पीडित महिला शहाड येथे एका खाजगी कंपनीत काम करते. टिटवाळा रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर ही पीडित महिला शेजारीच असलेल्या रुळावर चालून आपल्या घराकडे जात होती. एक इसम तीचा पाठलाग करत होता. पीडित महिला फोनवर आपल्या पतीशी बोलत होती . यादरम्यान पाठलाग करणाऱ्या इसमाने तिला जबरदस्तीने खेचून रुळालगत असलेल्या झाडाझुडपात नेले तिच्यावर बलात्कार केला . याच दरम्यान पीडित महिलेचा फोन सुरूच होता .

या इसमाने घटनेची कुठे वाच्यता केली तर जिवे ठार मारू अशी धमकी या नराधमाने दिली . घाबरलेल्या महिलेने घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला . तत्काळ आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत या नराधमाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले  . निशांत चव्हाण असे या नराधमाचं नाव असून त्याच्या विरोधात कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशांत हा पडघा येथे एका खाजगी कंपनीत काम करतो . याप्रकरणी सहाय्यक पोलीस  आयुक्त  मनोज पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण रेल्वे पोलीस पुढील  तपास करत आहेत.

Web Title: Rape of woman returning home walking on track; Shocking incident near Titwala railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.