दाऊदच्या नावे धमकी देत लेखिकेवर बलात्कार, मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमधील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 02:16 PM2022-06-16T14:16:15+5:302022-06-16T14:16:37+5:30
Rape Case : या ७५ वर्षीय व्यावसायिकाच्या विरोधात आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : जुहूमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या नावाची धमकी देत महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिला लेखिका आहे. एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये व्यावसायिकाने या लेखिकेचे लैंगिक छळ केला. शिवाय याबद्दल बाहेर कुठे वाच्यता केल्यास मारून टाकण्याची धमकीही त्याने दिली. या ७५ वर्षीय व्यावसायिकाच्या विरोधात आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील जुहू परिसरात असलेल्या एका फाईव्हस्टार हॉटेलमध्ये एका ७५ वर्षीय व्यावसायिकाने ३५ वर्षीय लेखिकेवर बलात्कार केला आहे. आरोपीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने बलात्कार पीडितेला धमकी दिली. आरोपी व्यावसायिकाने पीडित महिलेकडून 2 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते आणि ते परत केले नाही. तसेच पीडित महिलेने आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी व्यावसायिक आणि दाऊद इब्राहिमशी संबंधित लोकांनी याबाबत कोणाला काही सांगितले तर तिला ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा तपास सध्या आंबोली पोलिसांकडून एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस महिलेच्या तक्रारीची चौकशी करत आहेत.
बहिणीशी अनैतिक संबंध, भावाने हातपाय बांधून टेम्पो चालकाचा मृतदेह नदीत फेकला; असे उघडले रहस्य
अंधेरीत आईनेच मुलीचा गळा दाबून केली हत्या, पोलिसांना बोलावून असा रचला बनाव
महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 376(2) नुसार गुन्हा दाखल केला. आयपीसी एन504 च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबोली पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिस महिलेच्या आरोपांची चौकशी करत आहेत. या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे.