राजस्थान हादरलं! अल्पवयीन मुलीचं अपहरण करून बलात्कार, अश्लील व्हिडीओ अन् फोटो काढले 

By पूनम अपराज | Published: October 7, 2020 05:13 PM2020-10-07T17:13:02+5:302020-10-07T17:20:47+5:30

Rape : जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पीडित महिला व तिच्या कुटुंबीयांची शासकीय रूग्णालयात भेट घेतली आहे. 

Rape: Rajasthan shaked! Kidnapping and raping a minor girl | राजस्थान हादरलं! अल्पवयीन मुलीचं अपहरण करून बलात्कार, अश्लील व्हिडीओ अन् फोटो काढले 

राजस्थान हादरलं! अल्पवयीन मुलीचं अपहरण करून बलात्कार, अश्लील व्हिडीओ अन् फोटो काढले 

googlenewsNext
ठळक मुद्देबाडमेर जिल्ह्यातील शिव पोलिस स्टेशन परिसरातील एका गावात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ही घटना गावातीलच दोन तरुणांनी घडवून आणली. बलात्कारानंतर नराधमांनी अश्लील व्हिडीओ आणि फोटोही काढले. गुन्हा दाखल करण्यात आला आहे, परंतु आरोपी अद्याप फरार आहेत.

देशभरात मुलींवर बलात्काराची घटना कमी होत असून वाढतच आहेत. उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील १९ वर्षीय मुलीवर बलात्काराचे प्रकरणही राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील बलात्काराच्या घटनेने सर्वांना हादरवून टाकले आहे. बाडमेर जिल्ह्यातील शिव पोलिस स्टेशन परिसरातील एका गावात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी कुटुंबातील अन्य सदस्य मत देण्यासाठी गेले होते. कुटूंबाच्या तक्रारीच्याआधारे पोलिसांनी पॉक्सो अ‍ॅक्ट आणि आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पीडित महिला व तिच्या कुटुंबीयांची शासकीय रूग्णालयात भेट घेतली आहे.  पोलिसांनी स्वतंत्र पथक तयार केले असून आरोपीचा शोध सुरू आहे. पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातून पंधरा वर्षाची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार भीड चौकीतीळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर ती शाळेजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळली आणि पोलिसांना प्राथमिक उपचारानंतर तिला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.

 

शुद्धीवर आल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीने मला दोन मुलांना जबरदस्तीने पळवून नेल्याचे सांगितले. एका मुलाने मला शिवीगाळ केली, एकाने व्हिडिओ बनविला आणि फोटो काढले. अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर स्वतंत्र पथके तयार करून तपास सुरू केला.

जिल्हाधिकारी विश्राम मीणा म्हणाले की, पंचायतीमी राज निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यातील मतदान सुरू होते, कुटुंबातील सदस्य मत देण्यासाठी गेले होते. त्यावेळी दोन मुलांनी त्या अल्पवयीन मुलीचे अपहरण लेले आणि तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून स्वतंत्र पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. संशयितांची चौकशी केली जात आहे. राजस्थानमध्ये गेहलोत सरकारमध्ये सामूहिक बलात्काराचे एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. राजस्थानच्या बाडमेर येथे बलात्काराच्या घटनेने हादरली आहे. पीडितेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना गावातीलच दोन तरुणांनी घडवून आणली. सामूहिक बलात्कारानंतर नराधमांनी अश्लील व्हिडीओ आणि फोटोही काढले. गुन्हा दाखल करण्यात आला आहे, परंतु आरोपी अद्याप फरार आहेत.

Web Title: Rape: Rajasthan shaked! Kidnapping and raping a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.