बिलोली विद्यार्थिनी अत्याचार प्रकरण : न्यायासाठी आईने झिजविले अनेकांचे उंबरठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 08:53 PM2020-01-21T20:53:21+5:302020-01-21T20:57:24+5:30

राजकीय दबावतंत्राचा वापर करुन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

rape on student in Biloli : Mother struggled for justice | बिलोली विद्यार्थिनी अत्याचार प्रकरण : न्यायासाठी आईने झिजविले अनेकांचे उंबरठे

बिलोली विद्यार्थिनी अत्याचार प्रकरण : न्यायासाठी आईने झिजविले अनेकांचे उंबरठे

googlenewsNext
ठळक मुद्देपीडित मुलीला आर्थिक मदत देण्याची मागणीपालकमंत्री चव्हाण यांची भेट

- इलियास शेख

बिलोली : शंकरनगर येथील श्री साईबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील सहाव्या वर्गातील विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणात पीडितेच्या आईने न्यायासाठी अनेकांचे उंबरठे झिजविले़ परंतु अशिक्षितपणा आणि अठराविश्वे दारिद्र्य याचा आरोपीसह बडे राजकीय प्रस्थ असलेल्या मंडळींनी लाभ उचलला़ पीडितेची प्रकृती अधिक गंभीर होण्यास हाच विलंब कारणीभूत ठरला़ सध्या पीडितेवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून अद्यापही ती स्पष्टपणे शब्द उच्चारु शकत नाही़ 

गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना शंकरनगर येथे १३ डिसेंबर रोजी घडली़ या प्रकरणात पीडितेच्या आईशी संपर्क केला असता, अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या़ घटनेनंतर पीडितेच्या आईने मुख्याध्यापकाकडे न्यायासाठी धाव घेतली़ पिडीतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याऐवजी मुख्याध्यापकाने बदनामीची धमकी देवून त्यांच्याकडूनच तक्रार न देण्याचे शपथपत्र लिहून घेतले़ तसेच राजकीय पक्षाशी संबंधित एका नेत्याकडेही पीडितेच्या आईने या प्रकरणात दाद मागितली होती़ त्या ठिकाणी नेत्याने आरोपींची खरडपट्टी काढली अन् मुलीला उपचारासाठी चांगल्या रुग्णालयात दाखल करण्याची किरकोळ शिक्षा त्या आरोपी शिक्षकांना सुनावली़ 

या सर्व प्रकारात दिवसेंदिवस मुलीची प्रकृती ढासळत होती़ त्यामुळे पीडितेच्या आईचा संयमही सुटत होता़ अशिक्षितपणा आणि उपचारासाठीही पैसे नसल्यामुळे झालेल्या गंभीर प्रकाराबाबत वाच्यता न करता पीडितेच्या आईने मुलीवर उपचार होवून ती लवकर बरी कशी होईल? याच चिंतेत दिवस काढले़ अन् त्याचाच फायदा घेत आरोपी उजॠ माथ्याने समाजात वावरत होते़ परंतु सामाजिक संघटना आणि ग्रामस्थांनी एका गरीब अन् निराधार कुटुंबावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली़ दरम्यान, जिल्हाभरात या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे़ अनेक सामाजिक संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना कारवाईचे निवेदन देण्यात आले आहे़ त्यामध्ये पीडित मुलीला शासनाकडून अर्थसहाय्य मिळावे, अशी मागणीही करण्यात आली आहे़

पालकमंत्री चव्हाण यांची भेट

दरम्यान, पालकमंत्री तथा राज्याचे साार्वज़निक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण यांनी सोमवारी  डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात जावून पीडित मुलीची भेट घेवून तिच्या प्रकृतीची विचारपूस केली. उपचार करणाऱ्या डॉकटरांना त्यांनी योग्य त्या सूचना दिल्या. बलात्काराची घटना निंदणीय असून,  या प्रकरणात कोणीही  राजकारण आणू नये, असे सांगून अशोकराव चव्हाण यांनी प्रकरणाच्या तपासासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकऱ्यांना सूचना देवून कडक कारवाई करण्याचे आदेशित केल्याची माहिती अशोकराव चव्हाण यांनी दिली. दरम्यान, घटनेचा नांदेड जिल्ह्यात सर्वत्र तीव्र शब्दात धिक्कार केला जात असून, यातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, आरोपींना लवकर अटक करण्यात यावी, आदी मागण्या मुखेड, भोकर, कंधार येथील विविध संघटनांनी संबंधित तहसीलदार यांच्याकडे केली आहे. पोलिसांनी तपासात हयगय करु नये, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

पीडित मुलीला आर्थिक मदत देण्याची मागणी
च्बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील शाळेत विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करुन पीडित मुलीला आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी रंणागिणी महिला बचत गट संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे़आरोपी सय्यद रसूल, दयानंद राजूळे यांच्यासह मुख्याध्यापक, प्राचार्य आणि स्वयंपाकी अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ परंतु घटनेच्या तीन दिवसानंतरही आरोपींना अटक करण्यात आली नाही़ या घटनेचा मुलीच्या मनावर परिणाम झाला आहे़ तिला नीट बोलताही येत नाही़ त्यामुळे आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी़ तसेच पीडित मुलीला समाजकल्याण विभागाच्या वतीने आर्थिक मदत देण्यात यावी़ हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा़ अशी मागणी करण्यात आली आहे़ यावेळी संघटनेच्या अध्यक्षा महादेवी मठपती, प्रिती पुजारी, अश्विनी सोनुले, सविता बेटके, मंजू लोहराळकर, संगीता झिंजाळे, वैशाली इंगोले यांची उपस्थिती होती़ 

मी मेलो तर पोलीस तुलाच पकडतील
पीडितेची आई शिक्षकांच्या कृत्याचा पाढा मुख्याध्यापकाकडे वाचत असताना शिक्षकांनी त्यांनाच धमकी दिली़ मी मेलो तर पोलीस तुलाच पकडतील असा दम या शिक्षकांनी पिडीतेच्या आईला दिला़ त्यानंतर रुग्णालयातही हे शिक्षक दोन वेळेस येवून गेले़ महिलेवर अनेक प्रकारे आरोपींनी पिडीत महिलेच्या आईवर दबाव टाकण्याचा प्रयत्न के

निलंबनाचा प्रस्ताव
शंकरनगर येथील अत्याचार प्रकरणात आरोपी असलेले दोन्ही शिक्षक, मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांना निलंबित करण्याच्या सूचना पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिल्या आहेत़ बडतर्फी संदर्भात विचारले असता पहिल्या टप्प्यात निलंबन आवश्यक असल्याचे सांगितले़ तसेच पीडित मुलगी आणि तिच्या आईला संरक्षण देण्याच्या सूचना केल्या़

Web Title: rape on student in Biloli : Mother struggled for justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.