पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन केला बलात्कार; अश्लील फोटोच्या साहाय्याने धमकावले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 01:15 AM2019-01-11T01:15:20+5:302019-01-11T01:17:38+5:30

तरुणाने यावेळी तिचे अश्लील फोटो काढून त्याच्या साहाय्याने वारंवार धमकावून तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे मुलगी गर्भवती झाल्यामुळे हा सर्व प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलिसांनी बलात्कार, विनयभंग तसेच माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (आयटी) गुन्हा दाखल केला आहे.

Rape; Threatened with the help of nude photos | पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन केला बलात्कार; अश्लील फोटोच्या साहाय्याने धमकावले

पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन केला बलात्कार; अश्लील फोटोच्या साहाय्याने धमकावले

Next

मुुंबई - गुंगीचे औषध असलेला पेढा देऊन मुलीवर बलात्कार करणााऱ्या 20 वर्षीय तरुणाला मरिन ड्राईव्ह पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

आरोपी तरुणाने यावेळी तिने अश्लील फोटो काढून त्याच्या साहाय्याने वारंवार धमकावून तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे मुलगी गर्भवती झाल्यामुळे हा सर्व प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलिसांनी बलात्कार, विनयभंग तसेच माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (आयटी) गुन्हा दाखल केला आहे. 

तक्रारीनुसार, मरीन ड्राईव्ह पोलिसांच्या हद्दीतील एका वसाहतीत आरोपी व तक्रारदार तरुणी कुटुंबियांसोबत राहतात. फेब्रुवारी 2018 मध्ये दुपारी पीडित तरुणी आरोपीच्या घरासमोर आली असताना त्याने तिला पेढा दिला. त्यानंतर तिला गुंगी आल्यामुळे आरोपीने तिला घरी नेले. त्यानंतर शुद्धीवर आल्यानंतर आरोपीने तिच्यासोबत कुकर्म केले असल्याचे तिच्या लक्षात आले. मात्र, त्यावेळी आरोपीने तिला तिचे अश्लील फोटो दाखवून धमकावले. पण या फोटोंच्या साहाय्याने आरोपीने वारंवार तिला धमकावण्यास सुरूवात केली व शरीर सुखाची मागणी केली. त्याला नकार दिला असता आरोपी तरुणाने तिचे फोटो त्याने दोघांच्या मित्रालाही पाठवले. त्यानंतर आरोपीने वारंवार तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलगी आजारी पडल्यानंतर डॉक्‍टरांकडे तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. अखेर मुलीच्या तक्रारीनंतर आरोपी तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे. 

Web Title: Rape; Threatened with the help of nude photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.