बलात्कार पीडितेने CM योगींना लिहिले रक्ताने पत्र, न्याय द्या अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 02:44 PM2022-07-06T14:44:33+5:302022-07-06T14:46:08+5:30

Rape Victim wrote letter by blood : पीडितेच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या नावाखाली सुरेंद्र कुमार यादवने तिचे शारीरिक शोषण केले. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊनही आरोपी पोलिसांच्या अटकेपासून दूर आहे.

Rape victim wrote a letter to CM Yogi with blood, give justice or allow euthanasia | बलात्कार पीडितेने CM योगींना लिहिले रक्ताने पत्र, न्याय द्या अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्या

बलात्कार पीडितेने CM योगींना लिहिले रक्ताने पत्र, न्याय द्या अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्या

googlenewsNext

रायबरेली : उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील बलात्कार पीडितेने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना रक्ताने पत्र लिहिले आहे. बलात्कार पीडितेने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पीडितेच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या नावाखाली सुरेंद्र कुमार यादवने तिचे शारीरिक शोषण केले. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊनही आरोपी पोलिसांच्याअटकेपासून दूर आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
प्रकरण शहर कोतवाली भागातील आहे. येथे राहणाऱ्या एका विधवा महिलेने आरोप केला आहे की, भाडोखर पोलीस स्टेशन हद्दीतील शेरगंज गावात राहणाऱ्या शिपाईने लग्नाच्या नावाखाली तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पीडितेच्या बहिणीचे सासर त्याच गावात आहे. तेथे येत असताना पीडितेचा पोलीस शिपायाशी संपर्क झाला. त्यानंतर शिपायाने लग्नाच्या नावाखाली पीडितेवर शारीरिक अत्याचार करण्यास सुरुवात केली.

यादरम्यान शिपायाने तिच्याकडून चार लाख रुपयेही घेतल्याचा आरोप पीडितेने केला आहे. नंतर पोलीस शिपायाच्या हेतूवर संशय आल्याने पीडितेने लग्नासाठी दबाव टाकला. त्याच्या सुटकेसाठी शिपायाने आपला मोबाईल बंद केल्याचा आरोप आहे. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर पीडितेने नगर कोतवालीत तक्रार दिली.

रक्ताने लिहिले पत्र 
पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पोलीस शिपायाविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र, अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. पीडितेने अटकेसाठी गेल्या आठवड्यात पोलीस अधीक्षकांकडेही धाव घेतली. असे असतानाही पोलीस शिपायाला अटक न केल्याबद्दल पीडितेने आपल्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. आरोपीच्या भावाने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडितेने पत्रात केला आहे. यासोबतच सीएम योगी यांना इच्छामरणास परवानगी द्या किंवा न्याय मिळवून द्या अशी मागणी करण्यात आली आहे.

 

Web Title: Rape victim wrote a letter to CM Yogi with blood, give justice or allow euthanasia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.