तरुणीला दारू पाजून सामूहिक बलात्कार; लॉकडाऊनदरम्यान मिरजमध्ये धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 03:19 PM2020-04-23T15:19:40+5:302020-04-23T15:22:57+5:30
लॉकडाऊनदरम्यान पोलिस बंदोबस्त असतानाही मिरजेत रेल्वे स्थानकाजवळ मोकळ्या जागेत बलात्काराच्या घटनेने शहरात खळबळ उडाली होती.
मिरज - येथील मिरज रेल्वे स्थानकाजवळ विवाहित तरुणीस दारु पाजून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. गुरुवारी हे प्रकरण उजेडात आले. याप्रकरणी गांधी चौक पोलिसानी दोघांना अटक करुन बलात्कार व दलित अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडी दिली. लॉकडाऊनमध्ये बलात्काराच्या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली होती.
कोल्हापूर जिल्ह्यात सासर व मिरजेत औद्योगिक वसाहतीत बास्तव्य असलेली १९ वर्षीय विवाहिता बुधवारी सायंकाळी रेल्वेस्थानकालगत झोपडपट्टीत राहणार्या मैत्रिणीकडे आली होती. यावेळी तिच्या परिचयाच्या असलेल्या अक्षय राजू कणशेट्टी (वय १९ रा.मंगळवार पेठ मिरज) व राजू बाबू अच्युदन (वय ३० रा राॅकेल डेपो झोपडपट्टी मिरज) या दोघांनी तिला बोलावून सोबत नेले. तेथून जवळच असलेल्या गजानन हाॅटेलच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत तरुणीस दोघांनी दारु पाजली. नशेत असलेल्या तरुणीवर दोघांनी बलात्कार करुन नग्नावस्थेत तेथेच सोडून निघून गेले. मृत तरुणी नग्नावस्थेत पडल्याची एकाने माहिती गांधी चौक पोलीसांना कळविले. माहिती मिळाल्यानंतर गांधी चाैक पोलिसानी तेथे धाव घेतली. यावेळी तिला पीडित तरुणीस जबरदस्तीने दारू पाजून तिच्यावर अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला. लगेच बेशुद्ध महिलेला रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत गांधी चाैक पोलीस ठाण्यात राजू अच्युदन व अक्षय कणशेट्टी यांच्याविरुद्ध बलात्कार व दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यांत आला आहे.
लॉकडाऊनदरम्यान पोलिस बंदोबस्त असतानाही मिरजेत रेल्वे स्थानकाजवळ मोकळ्या जागेत बलात्काराच्या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. न्यायालयाने दोन्ही आरोपीना सात दिवस पोलीस कोठडी दिली. दोघे आरोपी व्यसनी व कोणताही कामधंदा नसलेले आहेत. यापैकी राजू या आरोपीची आई झोपडपट्टीत गांजा विक्रीचा व्यवसाय करते. दारु विक्री बंद असतानाही आरोपींनी दारु कोठून आणली याचा शोध सुरु असल्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण कांबळे यांनी सांगितले.