लॉकडाऊनमध्ये नोकरीच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार; पीडितेला घरात डांबून ठेवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 15:16 IST2020-07-16T15:16:02+5:302020-07-16T15:16:22+5:30

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी औरैया येथील रहिवासी असलेल्या महिलेने फफुंद पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली आहे.

Rape of a young woman under the pretext of a job in a lockdown; The victim was kept at home | लॉकडाऊनमध्ये नोकरीच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार; पीडितेला घरात डांबून ठेवलं

लॉकडाऊनमध्ये नोकरीच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार; पीडितेला घरात डांबून ठेवलं

ठळक मुद्देपोलिसांनी सांगितले की, तुर्कीपूर येथे राहणाऱ्या संतोष बाबू यांचा मुलगा प्रताप यादव याने चांगली नोकरीस लावतो असे प्रलोभन दाखवत तरुणीला नोएडा येथील एका खोलीत डांबून ठेवले आणि बलात्कार केला.

औरैया जिल्ह्यातील रहिवासी महिलेने नोकरीच्या बहाण्याने तिला नोएडा येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी औरैया येथील रहिवासी असलेल्या महिलेने फफुंद पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, तुर्कीपूर येथे राहणाऱ्या संतोष बाबू यांचा मुलगा प्रताप यादव याने चांगली नोकरीस लावतो असे प्रलोभन दाखवत तरुणीला नोएडा येथील एका खोलीत डांबून ठेवले आणि बलात्कार केला. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये घरी आणून ओलिस ठेवले. आरोपीव्यतिरिक्त त्याचे वडील संतोष बाबू, आई शकुंतला आणि बहीण संध्या हे देखील तिला मारहाण करत असत.

२ जून रोजी संधी मिळाल्यावर तिने मोबाईलवरून माहिती वडिलांना दिली. यानंतर तिचे वडील फफूंद पोलिसांसह तेथे आले आणि तिला मुक्त केले. पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
 

अन्य महत्वाच्या बातम्या...

निंदनीय प्रकार भोवला! मनसेच्या अविनाश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल 

 

ताई मला वाचव!  हबीब मला मारून टाकेल; रिदाने मृत्यूपूर्वी केला होता व्हिडिओ कॉल, म्हणाली होती...

 

हत्येनंतर चोराने बलात्कार केला; विवस्त्र मृतदेहाला फ्रिजमध्ये ठेवायचा प्रयत्न फसला

 

९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल

Web Title: Rape of a young woman under the pretext of a job in a lockdown; The victim was kept at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.