आईच्या जामिनासाठी मदतीच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 09:08 PM2019-09-16T21:08:46+5:302019-09-16T21:09:19+5:30
तिने आईला जामिनावर सोडविण्यासाठी त्याच्याकडे १० हजार रुपये मागितले़. त्याने पैसे देतो, असे सांगून त्यांच्या घरात गेला व तिच्या बलात्कार केला़.
पुुणे : आईला पोलिसांनी अटक केलेली़ ती येरवडा तुरुंगात़... भाऊ एका गुन्ह्यात फरार , अशा परिस्थितीत एका १५ वर्षाच्या मुलीने आईला जामिनावर सोडविण्यासाठी १० हजार रुपयांची मदत मागितली़. त्याने या मुलीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार केला़. ही मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिला त्रास होऊ लागल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे़. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाला अटक केली आहे़.
पृथ्वीराज राजेश म्हस्के (रा अपर इंदिरानगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे़. त्याच्याविरुद्ध बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (पास्को) गुन्हा दाखल केला आहे़. हा प्रकार मार्च २०१९ मध्ये घडला होता़.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर तिचा जामीन भरता न आल्याने तिची येरवडा तुरंगात रवानगी केली होती़. तसेच तिचा भाऊही एका गुन्ह्यात फरार होता़. ही १५ वर्षांची मुलगी घरात एकटीच होती़. तिने आईला जामिनावर सोडविण्यासाठी म्हस्के याच्याकडे १० हजार रुपये मागितले़. त्याने पैसे देतो, असे सांगून त्यांच्या घरात गेला व तिच्या बलात्कार केला़. त्यानंतर त्याने या मुलीवर वारंवार अत्याचार केले़ एकटी असलेली ही मुलगी त्याचे अत्याचार सहन करत राहिली़. त्यातून ती गर्भवती राहिली़.
काही काळाने मुलीची आई तुरुंगातून बाहेर आली़. मुलीला होत असलेला शारीरिक त्रास व तिच्यात झालेला बदल पाहून आई तिला घेऊन ससून रुग्णालयात गेली़. तेथे तपासणी केल्यावर ही अल्पवयीन मुलगी २४ आठवड्याची गर्भवती असल्याचे दिसून आले़. त्यानंतर तिने मुलीकडे चौकशी केल्यावर तिने आपल्यावरील अत्याचाराची माहिती दिली़ ते समजल्यावर आई, मुलीला घेऊन भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गेली़. पोलिसांनी तिची फिर्याद दाखल करुन घेऊन आरोपीला अटक केली आहे़.