आधी महिलांसोबत केला रेप, नंतर प्राइवेट पार्ट बदलून बनला महिला; कोर्टात न्यायाधीशही बघत राहिले!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 11:06 AM2023-01-27T11:06:15+5:302023-01-27T11:09:31+5:30

Rapist became a woman : पोलिसांनी सांगितलं की, स्कॉटलॅंडमध्ये एडम ग्राहमवर दोन महिलांसोबत रेप करण्याचा आरोप आहे. 2016 मध्ये त्याने पहिल्यांदा एका महिलेवर बलात्कार केला होता.

Rapist became a woman by changing private parts in Scotland | आधी महिलांसोबत केला रेप, नंतर प्राइवेट पार्ट बदलून बनला महिला; कोर्टात न्यायाधीशही बघत राहिले!

आधी महिलांसोबत केला रेप, नंतर प्राइवेट पार्ट बदलून बनला महिला; कोर्टात न्यायाधीशही बघत राहिले!

googlenewsNext

Rapist became a woman : गुन्हेगार त्यांनी केलेल्या गुन्ह्यापासून वाचण्यासाठी नको नको ते करत असतात. पण ते हिंदीत म्हणतात ना - कानून के हाथ लंबे होते हैं. त्यांच्यापासून कुणीच वाचू शकत नाही. अशीच एक हैराण करणारी घटना स्कॉटलॅंडमधून समोर आली आहे. एका रेपिस्टने दोन महिलांसोबत रेप केला आणि नंतर पकडला जाऊ नये म्हणून प्राइवेट पार्ट बदलून महिला बनला. कोर्टात हजर केल्यावर तिला पाहून न्यायाधीशही हैराण झाले आणि तिच्याकडे बघत राहिले.

पोलिसांनी सांगितलं की, स्कॉटलॅंडमध्ये एडम ग्राहमवर दोन महिलांसोबत रेप करण्याचा आरोप आहे. 2016 मध्ये त्याने पहिल्यांदा एका महिलेवर बलात्कार केला होता. दोघेही एक डेटींग अॅपवर भेटले होते. नंतर एका फ्लॅटवर बोलवून त्याने हे कृत्य केलं होतं. नंतर 2019 मध्ये त्याने एका महिलेला शिकार बनवलं. पोलिसांनी अटक केली तेव्हा तो एक पुरूष होता आणि चेहऱ्यावर माइक टायसनचा टॅटू होता. नंतर तो जामिनावर बाहेर आला.

नंतर जेव्हा पोलिसांनी त्याला पकडलं तेव्हा तो पूर्णपणे बदलला होता. त्याने त्याच्या प्राइवेट पार्ट बदल केले होते. आता एडम ग्राहम इस्ला ब्रायसन बनला होता. जेव्हा त्याला ग्लासगो हायकोर्टात हजर करण्यात आलं तेव्हा त्याला पाहून न्यायाधीशही हैराण झाले आणि त्याच्याकडे एकटक बघत राहिले. आता त्यांना समजत नव्हतं की, त्याच्यावर केस कशी चालवावी. कारण गुन्हे तर त्याने एक पुरूष म्हणून केले होते आणि नंतर तो महिला बनला.

ज्यूरी सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर त्याचं लिंग परीक्षण करण्यात आलं आणि जेव्हा स्पष्ट झालं की, ती महिलाच आहे तर तिला महिलांच्या तुरूंगात पाठवण्याचा निर्णय झाला. सध्या तिला महिला तुरूंगात एका वेगळ्या सेलमध्ये ठेवलं आहे. कारण भीती आहे की, इतर महिलांसोबत काही चुकीचं करता येऊ नये.

कोर्टासाठी सगळ्यात मोठी अडचण ही आहे की, केसचा आधार काय असेल. बचाव पक्षाचे वकील एडवर्ड टार्गोव्स्की कोर्टात म्हणाले की, जर त्याला महिला समजून निर्णय दिला तर अवघड होईल आणि हे सिद्ध करण्यासाठी मोठा वेळ लागेल की, हे कसं झालं. स्कॉटिश कोर्ट एखाद्या अशा व्यक्तीला रेपच्या केसमध्ये शिक्षा देऊ शकत नाही जी महिला आहे. कारण तिथे असा काही कायदा नाही. 

स्कॉटलॅंडमध्ये लोकांना चिंता ही आहे की, अशाप्रकारे तर कुणीही लिंग परिवर्तन करून चेंजिंग रूम, तुरूंग आणि महिला हॉस्टेलमध्ये शिरेल आणि महिलांसोबत गैरर्वतन करेल. हा महिलांसोबत अन्याय होईल.
 

Web Title: Rapist became a woman by changing private parts in Scotland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.