अखेर 'रॅपर' राम मुंगासेला अटक, रोहित पवार संताप व्यक्त करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 06:46 PM2023-04-06T18:46:47+5:302023-04-06T18:50:59+5:30

शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा “काय झाडी, काय डोंगर, काय हाटील” हा डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल झाला होता

Rapper Ram Mungase was finally arrested, Rohit Pawar expressed his anger and said... | अखेर 'रॅपर' राम मुंगासेला अटक, रोहित पवार संताप व्यक्त करत म्हणाले...

अखेर 'रॅपर' राम मुंगासेला अटक, रोहित पवार संताप व्यक्त करत म्हणाले...

googlenewsNext

शिवसेनेत झालेल्या बंडाळीत वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे, शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे. बंडखोर आमदार सर्वप्रथम गुजरातमधील सुरत, त्यानंतर आसाममधील गुवाहाटी आणि मग गोवा असा प्रवास करत महाराष्ट्रात आले. या सत्तासंघर्षात एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले तर, राज्यातही सत्तातर घडून आले. त्यानंतर, विरोधकांनी, महाविकास आघाडीच्या समर्थकांनी ५० खोके, एकदम ओक्के असे म्हणत शिंदे गटाला लक्ष्य केलं. काही दिवसांपूर्वी यावर एक रॅपही व्हायरल झाला होता. आता, या रॅपरला अटक करण्यात आली आहे. त्यावरुन, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.  

शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा “काय झाडी, काय डोंगर, काय हाटील” हा डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरुनही विरोधकांनी शिंदे गटाला ट्रोल केलंय. या संपूर्ण प्रकरणावर एका मराठी तरुणाने रॅप बनवला आहे. त्याने आपल्या रॅपमधून शिंदे गटावर थेट हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ह्या रॅपरचा व्हिडिओ शेअर करत या तरुणाला अटक करु नका, असे म्हटले होते. मात्र, अंबरनाथ पोलिसांत तक्रार झाल्यानंतर आता या रॅपर राम मुंगासेला अटक करण्यात आलीय. मराठवाड्याच्या  जालन्यातील पोलिसांनी रॅपरला अटक केली असून त्यास आता अंबरनाथ पोलिसांकडे सोपवण्यात येणार आहे. 

मात्र, या अटकेनंतर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन संताप व्यक्त केला आहे. आपल्या रॅप साँगमध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख नसतानाही राम मुंगासे या तरुण कलाकाराला ५० खोके या शब्दामुळं अटक होत असेल तर हा सरकारचा कबुलीजबाबच नाही का? शिव्याचं कुणीही समर्थन करत नाही, पण राज्यातील खुद्द एका मंत्र्यानेच महिला लोकप्रतिनिधीला अर्वाच्च शिविगाळ केली तेंव्हा कारवाई करण्याऐवजी सरकारने कानात बोटं घातली आणि डोळे बंद केले. ब्रिटीश राजवटीची आठवण करुन देणारा हा धोकादायक कारभार आहे, असे रोहित पवार यांनी म्हटलंय. 

 

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाडांनी “या तरुणाला अटक करू नका” अशी पोलिसांकडे विनंती केली होती. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं होतं, “ह्या कलाकाराला सलाम… पोलिसांना विनंती, याला अटक करू नका.” संबंधित रॅप म्हणणारा तरुण तरुण नेमका कोण आहे? याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, त्या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे.
 

Web Title: Rapper Ram Mungase was finally arrested, Rohit Pawar expressed his anger and said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.