रावेर दंगल भोवली, पाच जणांची नाशिक कारागृहात रवानगी; जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 03:18 PM2020-09-20T15:18:52+5:302020-09-20T15:26:26+5:30

एकाच वेळी पाच जणांवर एमपीडीएची कारवाई झाल्याने गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

Raver riots, five sent to Nashik jail; action of Collector & Superintendent of Police | रावेर दंगल भोवली, पाच जणांची नाशिक कारागृहात रवानगी; जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांचा दणका

रावेर दंगल भोवली, पाच जणांची नाशिक कारागृहात रवानगी; जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांचा दणका

Next

जळगाव - रावेर येथे २२ मार्च रोजी उसळलेल्या दंगलीला कारणीभूत ठरलेल्या पाच जणांविरुध्द एमपीडीएची कारवाई करण्यात आली आहे. याआधी देखील या दंगलीला कारणीभूत ठरलेल्या ३७७ संशयितांविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून यात झालेले नुकसान गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या आरोपींकडून वसूल करण्याचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. एकाच वेळी पाच जणांवर एमपीडीएची कारवाई झाल्याने गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

एमपीडीएची कारवाई झालेल्यांमध्ये आदीलखान उर्फ राजू बशीर खान (२२, रा.फुकटपुरा, रावेर), शेख मकबूल अहमद शेख मोहीनोद्दीन (५७, रा.मन्यारवाडा, रावेर), स्वप्नील मनोहर पाटील (२६, रा.बक्षीपूर, ता.रावेर), शेख कालू शेख नुरा (५३, रा.रावेर), व मधुकर उर्फ मधू पहेलवान रामभाऊ शिंदे (६२, रा.रावेर) यांचा समोवश आहे. त्यांना लागलीच स्थानबद्ध करुन रविवारी नाशिक मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी प्रस्ताव तयार करुन तो जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे पाठविला होता. राऊत यांनी शनिवारी आदेश काढले व रविवारी या पाच जणांना स्थानबध्द करण्यात आले.

रावेर येथे झालेल्या दंगलीत एक जण ठार झाला होता तर दोन जण गंभीर जखमी झाले होते. त्याशिवाय या दंगलीत ६ कोटी २० लाख ९१ हजार ५५ रुपयांचे नुकसान झाले होते. दंगल व इतर गुन्ह्यांना आळा बसावा, गुन्हेगारांनी डोक वर काढू नये यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी दंगलीला कारणीभूत ठरलेल्यांविरुध्द एमपीडीएची कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम, रावेरचे निरीक्षक रामदास वाकोडे यांनी रावेर दंगलीचा अभ्यास करुन गुन्हेगारांची कुंडली काढली. त्यात या पाच जणांवर ठपका ठेवण्यात आला. प्रस्ताव तयार करुन तो पोलीस अधीक्षकांच्या मान्यतेनंतर अंतिम आदेशासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे पाठविण्यात आला होता. राऊत यांनी हा प्रस्ताव मंजूर करुन एमपीडीएचे आदेश जारी केले.
काय आहे एमपीडीए
एखाद्या गुन्हेगारापासून समाजाला धोका पोहचत असेल तर त्याच्याविरुध्द एमपीडीएची कारवाई करण्यात येते. त्यात महाराष्टÑ झोपडपट्टी,हातभट्टीवाले, औषधद्रव्ये विषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती अर्थात व्हीडीओ पायरेट, वाळू तस्कर, अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्तींच्या कृत्यांना आळा घालण्याचा नियम ३८१ प्रमाणे ही कारवाई करण्यात येते. रावेर दंगलीतील पाचही जणांना नोटीसा बजावून रविवारी दुपारी १२.४० वाजता नाशिक कारागृहात दाखल करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी ह्यलोकमतह्ण ला दिली.

रावेरात ७४ वर्षात ४२ दंगली
रावेर शहरात १९४६ ते मार्च २०२० या कालावधीत ७४ वर्षात धार्मिक तेढ निर्माण करणाºया तब्बल ७४ दंगली झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. प्रत्येक दंगलीत गुन्हे दाखल करणे, आरोपी अटक करणे, त्यांना कारागृहात पाठविणे व कायद्यान्वे शिक्षा या प्रचलित कायद्यान्वये कारवाई केली गेली आहे. आता प्रथमच नुकसान करणाऱ्यांकडून त्याची वसुली करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.

Web Title: Raver riots, five sent to Nashik jail; action of Collector & Superintendent of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.