आरबीआय चोर है! आरबीआय खुनी है!, कोर्टाबाहेर खातेदारांची निदर्शनं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 04:48 PM2019-10-16T16:48:26+5:302019-10-16T16:55:30+5:30

खातेदारांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेतली.

RBI is a thief! RBI murderer! pmc bank account holders agitates outside Chief Metropolitan Magistrate Court | आरबीआय चोर है! आरबीआय खुनी है!, कोर्टाबाहेर खातेदारांची निदर्शनं

आरबीआय चोर है! आरबीआय खुनी है!, कोर्टाबाहेर खातेदारांची निदर्शनं

Next
ठळक मुद्देखातेदारांच्या आंदोलनादरम्यान पीएमसी बँकेत पैसे अडकलेल्या शंकर कोटियन यांना भोवळ आली. पीएमसी खातेदारांनी कोर्टाच्या बाहेर आरबीआय चोर है! आरबीआय खुनी है! अशा घोषणा देत जोरदार निदर्शनं केली.

मुंबई - सीएसएमटी येथील किल्ला कोर्टात आज पीएमसी बँक घोटाळ्यातील अटक आरोपींना दुपारी हजर करण्यात आले.  ईडीने अटक केलेल्या राकेश आणि सारंग वाधवान माजी अध्यक्ष वरियमसिंग कर्तारसिंग यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. त्यामुळे त्यांना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी पीएमसी खातेदारांनी कोर्टाच्या बाहेर आरबीआय चोर है! आरबीआय खुनी है! अशा घोषणा देत जोरदार निदर्शनं केली. या खातेदारांच्या आंदोलनादरम्यान पीएमसी बँकेत पैसे अडकलेल्या शंकर कोटियन यांना भोवळ आली. त्यांनी पोलिसांच्या मदतीने जमिनीवर बसवून पाणी देण्यात आले. 

त्यानंतर पीएमसी बँकेविरोधात आंदोलन पुकारलेल्या खातेदारांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेतली. दरम्यान, आयुष्याची जमवलेली पुंजी परत मिळावी यासाठी त्यांनी बर्वे यांच्याकडे विनंती केली. मागच्या वेळी देखील पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपींना कोर्टात हजर करताना खातेदारांनी अशा प्रकारे आंदोलन करत आरोपींना जामीन मिळू नये म्हणून निदर्शनं केली होती. 

Web Title: RBI is a thief! RBI murderer! pmc bank account holders agitates outside Chief Metropolitan Magistrate Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.