जनजागृती कार्यक्रमातून दोन मुलींवरील अत्याचाराला वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 06:43 AM2018-12-27T06:43:54+5:302018-12-27T06:43:57+5:30

बापासह चुलत्याने एका मुलीवर तर भावाने सख्ख्या बहिणीवर बलात्कार केल्याचा उलगडा एका जनजागृती कार्यक्रमात स्वत: या अल्पवयीन मुलींनी केला.

 Read against the abuse of two girls from the awareness program | जनजागृती कार्यक्रमातून दोन मुलींवरील अत्याचाराला वाचा

जनजागृती कार्यक्रमातून दोन मुलींवरील अत्याचाराला वाचा

Next

मुंबई : बापासह चुलत्याने एका मुलीवर तर भावाने सख्ख्या बहिणीवर बलात्कार केल्याचा उलगडा एका जनजागृती कार्यक्रमात स्वत: या अल्पवयीन मुलींनी केला. शिवाजीनगर विभागात चुलत्यासह बापाने आपल्या लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची, तर भावाने बहिणीवर अत्याचार केल्याची घटना कार्यक्रमात उघडकीस आली. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी बाप आणि भावाला अटक केली आहे.
काही सामाजिक संस्था आणि शिवाजीनगर पोलिसांनी रफिकनगर येथील एका उर्दू शाळेत अल्पवयीन मुला-मुलींसाठी २५ डिसेंबर रोजी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी पोलीस दीदी आणि सामाजिक संस्थांच्या मार्गदर्शकांनी ठरावीक वयानंतर आपल्यात होणारे शारीरिक बदल आणि समाजात वावरताना असामाजिक तत्त्व कशाप्रकारे आपल्यावर नकळत अत्याचार करतात, याची माहिती दिली. या संदर्भातील प्रेरणादायी मार्गदर्शन मिळताच, येथे उपस्थित दोन अल्पवयीन मुलींनी संस्थांतील महिलांना आपल्यावरही गेल्या अनेक महिन्यांपासून अत्याचार होत असल्याची माहिती देत रडू लागल्या. पोलिसांनी चौकशी केली असता, एका १३ वर्षीय मुलीने आपल्यावर वडील आणि काका गेल्या वर्षभरापासून लैंगिक अत्याचार करीत असल्याचे सांगितले, तसेच दुसऱ्या १३ वर्षीय मुलीने आपल्या १६ वर्षीय भावानेसुद्धा आपल्यावर अत्याचार केला असे सांगितले.
सामाजिक संस्थेच्या महिला कार्यकर्त्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगून वडिलांसह चुलत्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी वडिलांना अटक केली असून, या प्रकरणी त्याच्यावर बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला, तर चुलत्याचा शिवाजीनगर पोलीस ठाणे शोध घेत आहे. दुसºया मुलीच्या भावाला अटक केली आहे. तो अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आल्याची माहिती या विभागाचे सहायक पोलीस आयुक्त दिनेश देसाई यांनी दिली आहे. मुंबई पोलीस गेली दोन वर्षांपासून पोलीस दीदी या कार्यक्रमातून विविध शाळांत जाऊन लहान मुलांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेत आहेत. त्यातून अशा विविध घटना उघडकीस येत आहेत.

Web Title:  Read against the abuse of two girls from the awareness program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.