पिंपरीत मारहाण करून रिसेप्शनिस्ट मुलीचा विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 16:59 IST2019-07-04T16:58:36+5:302019-07-04T16:59:24+5:30

रुग्णालयात अनाधिकाराने घुसून रिसेप्शनिस्ट मुलीला शिवीगाळ करून तसेच मारहाण करून विनयभंग केला.

Receptionist girl beating amd molested in a pimpri | पिंपरीत मारहाण करून रिसेप्शनिस्ट मुलीचा विनयभंग

पिंपरीत मारहाण करून रिसेप्शनिस्ट मुलीचा विनयभंग

पिंपरी : रुग्णालयात अनाधिकाराने घुसून रिसेप्शनिस्ट मुलीला शिवीगाळ करून तसेच मारहाण करून विनयभंग केला. मुलीच्या वडिलांनाही मारहाण करून दुखापत केली. पिंपळे गुरव येथे मंगळवारी (दि. २) हा प्रकार घडला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद हाजी शेख (वय २८) व अमजद बादल (वय ३३, दोघेही रा. पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रुग्णालयाचा मालक असलेल्या डॉक्टरने फिर्याद दिली आहे. 
फियार्दी यांचे पिंपळे गुरव येथे रुग्णालय आहे. पीडित रिसेप्शनिस्ट मुलगी मंगळवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास रुग्णालयात होती. त्यावेळी आरोपी शेख व बादल रुग्णालयात अनाधिकाराने घुसले. रिसेप्शनिस्ट मुलीला शिवीगाळ करून हाताने मारहाण करून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच मुलीचे वडील तेथे आले असता आरोपींनी त्यांना काठीने व हाताने मारहाण करून दुखापत केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Receptionist girl beating amd molested in a pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.