रेल्वेमध्ये भरती, मुलाखत...; 50 जणांकडून उकळले 1 कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 11:27 AM2020-08-27T11:27:44+5:302020-08-27T11:28:59+5:30
2019 च्या जूनमध्ये देखील पोलिसांनी पुरोहितला अटक केली होती. तेव्हा त्याने चार जणांसोबत मिळून हा फसवणुकीचा धंदा सुरु केला होता.
बडोदा : गुजरातच्या बडोदा शहर पोलिसांनी नोकरीच्या नावे फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या रॅकेटने रेल्वे न्यायालयात नोकरी देण्याचे आमिष दाखवून 50 जणांकडून 1 कोटी रुपये हडप केल्याचे समोर आहे. एसओजी टीमवने या प्रकरणी तीन लोकांना अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, हे रॅकेट बडोदा, सूरत आणि वलसाडच्या भागात कार्यरत होते. या भागातील 50 लोकांना फसविण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या 14 महिन्यांत दुसऱ्यांदा या रॅकेटला पकडण्यात आले आहे. ही गँग लोकांना सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन देत होती. रेल्वेमध्ये भरती निघाली असून त्यामध्ये थेट नोकरी देण्याचे आमिष दाखविण्यात येत होते. त्यांच्या बतावणीला बळी पडून अनेक तरुण रेल्वेमध्ये नोकरीसाठी अप्लाय करत होते आणि या ठकांना पैसे देत होते.
या टोळक्याचा म्होरक्या तुषार पुरोहित होता. त्याच्यासोबत कुशल पारेश आणि दिलीप सोळंकी यांना पकडण्यात आले आहे. गँगने लोकांकडून कागदपत्रे तयार करण्यासाठी, मिलाखत आणि परिक्षेत पास करण्याच्या नावाखाली एका व्यक्तीमागे 4 ते 5 लाख रुपये हडप केले आहेत.
पुरोहित हा परिक्षेचा पेपर सेट करत होता. उमेदवार जाळ्यात सापडला की त्याची मुलाखत घेत होता. एवढेच नाही तर त्यांना रेल्वेचे रबर स्टँप असलेले निय़ुक्तीपत्रही दिले जात होते. पुरोहित हा कंत्राटी पद्धतीने रेल्वेत नोकरी करत होता. यामुळे पोलिसांनी आता रेल्वे अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुरोहित हे एकट्यानेच करत होता की यामध्ये कोणच्या रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे याचाही तपास केला जाणार आहे.
गेल्या वर्षी देखील या आरोपींकडून लेटरहेड्स, रेल्वे मंत्रालयाचे लोगो, रबर स्टँप, ओळखपत्र, सर्टिफिकेट आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले होते. 2019 च्या जूनमध्ये पोलिसांनी पुरोहितला अटक केली होती. तेव्हा त्याने चार जणांसोबत मिळून हा फसवणुकीचा धंदा सुरु केला होता.
अन्य महत्वाच्या बातम्या...
लडाखमध्ये परिस्थिती खूपच गंभीर; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची कबुली
बडे काम की चीज! LIC ने आणली नवी पॉलिसी; आयुष्यभर देणार उत्पन्न
शेवटी आयआयटीच ती! कारसाठी बनविली जबरदस्त बॅटरी; एका चार्जिंगमध्ये 1600 किमीची रेंज
CoronaVirus News चीनला भिडला! छोट्याशा देशाने कोरोनावर लस बनविली; साईड इफेक्ट शून्य
एकटीला पाहून साधुने बलात्काराचा प्रयत्न केला; मार्शल आर्ट मास्टर महिलेने धु धु धुतले