सोलापूर जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचार, विनयभंगाच्या गुन्ह्यात घट

By Appasaheb.patil | Published: January 18, 2023 04:51 PM2023-01-18T16:51:44+5:302023-01-18T16:58:29+5:30

अत्याचार, विनयभंग व महिलांसंदर्भातील इतर गुन्हे कमी करण्यासाठी ग्रामीण पोलिसांची टीम प्रयत्न करीत आहेत.

Reduction in the crime of rape and molestation against women in Solapur district | सोलापूर जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचार, विनयभंगाच्या गुन्ह्यात घट

सोलापूर जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचार, विनयभंगाच्या गुन्ह्यात घट

googlenewsNext

सोलापूर : गेल्या काही वर्षापासून अत्याचार, विनयभंगाचे गुन्हे सर्वत्र वाढत असले तरी सोलापूर ग्रामीण पोलिस दलात या गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. मागील तीन वर्षांत अत्याचाराचे गुन्हे मायनस सहा झाले आहेत तर विनयभंगाचे गुन्हे मायनस ४६ झाल्याचे सांगण्यात आले. अत्याचार, विनयभंग व महिलांसंदर्भातील इतर गुन्हे कमी करण्यासाठी ग्रामीण पोलिसांची टीम प्रयत्न करीत आहेत. गुन्हेगारांना कडक शिक्षा सुनावण्यासाठी पोलिस सर्वोतोपरी प्रयत्न करतात, त्यामुळे गुन्हेगारांवर चांगलाच वचक बसला आहे.

तीन वर्षांत अत्याचाराचे २२६ गुन्हे
मागील तीन वर्षांत सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या हद्दीत २२६ अत्याचाराचे गुन्हे घडले आहेत. प्रत्येक गुन्ह्यातील आरोपीला कडक शिक्षा सुनाविण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. कडक शिक्षेमुळे अनेकांवर कायद्याचा धाक बसला असून गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यात पोलिसांना यश आले आहे.

तीन वर्षांत विनयभंगाचे १,१७२ गुन्हे
मागील तीन वर्षांत सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या हद्दीत १,१७२ विनयभंगाचे गुन्हे घडले आहेत. अनेक गुन्ह्यात आरोपींना अटक करून शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, बहुतांश गुन्ह्यातील आरोपी ‘पाहिजे आरोपी’ म्हणून घोषित केले आहेत. या पाहिजे आरोपींचा पोलिस कसूनपणे शोध घेत आहेत.

अशी होते आरोपींना शिक्षा...
पोलिस ठाण्यात अत्याचार व विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर संंबंधित तपास अधिकारी आरोपीला अटक करतात. त्यानंतर न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालय जी शिक्षा सुनावेल ती शिक्षा त्या आरोपीला ठोठाविण्यात येते. जास्त जास्त वर्षे व कडक शिक्षा मिळावी, यासाठी पोलिस प्रयत्न करतात. यात सरकारी वकिलांची भूमिका महत्त्वाची ठरते.
 

Web Title: Reduction in the crime of rape and molestation against women in Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.