चिकन चिलीला नकार, पत्नीला घराबाहेर हाकलले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 12:00 PM2023-08-31T12:00:40+5:302023-08-31T12:01:07+5:30
तक्रारदार तरुणी विनया (नावात बदल) ही कांदिवलीच्या अशोकनगर परिसरात वृद्ध आई-वडिलांसोबत राहते.
मुंबई : पत्नीने चिकन चिली बनविण्यास नकार दिला. या रागात पतीने लॅपटॉप फोडून तिला घराबाहेर काढल्याचा प्रकार बोरिवलीमध्ये घडला. याप्रकरणी ३८ वर्षीय बीई (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन) केलेल्या तरुणीने पोलिसांत धाव घेत पती आणि सासूविरोधात तक्रार दिली. याप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार तरुणी विनया (नावात बदल) ही कांदिवलीच्या अशोकनगर परिसरात वृद्ध आई-वडिलांसोबत राहते. तसेच विलेपार्लेच्या खासगी टेक्नॉलॉजी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करते. लोअर परळच्या तावडे विवाह मंडळ यांच्याकडून आलेल्या स्थळाशी तिचे कांदिवली पूर्वच्या ठाकूर हॉलमध्ये तिचे लग्न झाले. सुरुवातीला सर्व काही चांगले होते, मात्र नंतर दोघांच्यात खटके उडत होते. तसेच पैशाची मागणी करत होते.
दोघांमधील वाद मिटवण्यासाठी पतीपत्नीचे
दोघांमधील वाद मिटवण्यासाठी पती-पत्नीचे काउन्सिलिंग झाले. मात्र, त्या नंतरही पतीमध्ये काहीच फरक पडला नाही असे जबाबात तिने म्हटले आहे.
तिच्या दोन्ही मुली सासरी आहेत, त्यामुळे अखेर १७ मे रोजी तिने बोरिवली पोलिसांत लेखी अर्ज दिला. त्यानुसार ४२ वर्षीय पती आणि ७० वर्षांच्या सासूने मानसिक व शारीरिक छळ करत स्त्रीधनाचा अपहार केल्याप्रकरणी पोलिसांनी २९ ऑगस्ट रोजी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
सुरुवातीला प्रत्येकी ८ हजार आणि नंतर २० हजार रुपये घरखर्चही तिने देण्यास सुरुवात केली. पहिली मुलगी झाल्यावर दुसरा चान्स घ्यावा लागेल, असा दबाव सासूने आणल्याने दुसऱ्या मुलीला जन्म दिला असा तिने आरोप केला आहे. दोन्ही मुलींच्या औषधोपचाराचा खर्चही तीच करत होती.