लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवकाचा लग्नास नकार; युवतीनं घेतला टोकाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 08:36 PM2022-11-24T20:36:00+5:302022-11-24T20:36:21+5:30
मुरादाबाद इथं भाड्याने घेतलेल्या खोलीत २ दिवसांपूर्वी २४ वर्षीय मुलीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला
मुरादाबाद - उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद इथे युवकानं लग्नास नकार दिल्यामुळे मुलीनं गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडलीय. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमसाठी पाठवला. युवकाचं लग्न दुसऱ्या ठिकाणी ठरलं होतं. त्यामुळे युवती मानसिक तणावाखाली असल्याने तिने टोकाचा निर्णय घेतला. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलं.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरादाबाद इथं भाड्याने घेतलेल्या खोलीत २ दिवसांपूर्वी २४ वर्षीय मुलीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. शेजाऱ्यांनी दुर्गंध येऊ लागल्याने पोलिसांना कळवले. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी दरवाजा उघडताच समोर त्यांना हे दृश्य दिसले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला. मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला. त्यात मुलीचा मृत्यू २ दिवसांपूर्वी झाल्याचं समोर आले.
मुलीच्या नातेवाईकांची केली चौकशी
या प्रकरणात पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांना बोलावलं. त्यांनी एका मुलावर संशय व्यक्त केला. पोलिसांनी मुलीच्या मोबाईल आधारे तारेश नावाच्या युवकाला ताब्यात घेतले. तपासात कळालं की, तारेश आणि मृत मुलगी दोघेही खूप दिवसांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मुलगी कॅम्प्युटर कोर्स केला होता. मुलगी आणि युवकामध्ये लग्नावरून वाद सुरू होता. युवक मुलीपासून वेगळा झाला होता. तो दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणार होता. त्यामुळे मुलगी त्रस्त होती. त्यातून तिने आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे.
याबाबत पोलीस अधिकारी हेमराज मीना यांनी म्हटलं की, तारेशचं लग्न दुसऱ्या मुलीसोबत ठरलं होते. लग्नावरून दोघांमध्ये वाद सुरू होते. मृत मुलीला तारेशची लग्न करायचं होते. त्यावरून ती मानसिक तणावाखाली होते. दोघांमध्ये वाद असल्याने तिने हे टोकाचं पाऊल उचललं. सध्या आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.
हा युवक मुलीच्या शेजारी राहायचा. अनेक दिवसांपासून ते संपर्कात होते. आरोपी युवक अनेक खासगी उद्योग करायचा. मुलीच्या भावाने सांगितले की, माझी बहीण कॉम्प्युटर कोर्स करायची. ३ दिवसांपासून तिला कॉल करत होतो पण ती फोन उचलत नव्हती. जेव्हा चौथ्या दिवशी कॉल उचलला नाही. तेव्हा ती कुठे राहतेय हे जाणून घेतले. ती १ महिन्यापासून वेगळी राहत होती. पोलीस सर्व अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"