मुलीच्या शिक्षणासाठी लोन देण्यास बॅंकेचा नकार, साधू रायफल घेऊन बॅंक लुटण्यासाठी गेला आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 02:24 PM2022-09-20T14:24:04+5:302022-09-20T14:24:29+5:30

Crime News : आरोपी साधू थिरूमलाई स्वामी मुलगूंडीमध्ये असतो. त्याची मुलगी चीनमध्ये मेडिकलचं शिक्षण घेत आहे. तो तिच्या शिक्षणासाठीच लोनचं घेण्यासाठी सिटी यूनियन बॅंकेत गेला होता. 

Refused loan monk carries rifle into bank threatens employees facebook live | मुलीच्या शिक्षणासाठी लोन देण्यास बॅंकेचा नकार, साधू रायफल घेऊन बॅंक लुटण्यासाठी गेला आणि मग...

मुलीच्या शिक्षणासाठी लोन देण्यास बॅंकेचा नकार, साधू रायफल घेऊन बॅंक लुटण्यासाठी गेला आणि मग...

googlenewsNext

Crime News : तामिळनाडूच्या तिरवरूरमधून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे लोन देण्यास नकार दिल्यावर एक साधू बंदूक घेऊन बॅंक लुटण्यासाठी पोहोचला. इतकंच नाही तर ही घटना आपल्या फेसबुकवर पेजवर लाइव्ह टेलिकास्टही करत राहिला. पोलिसांनी त्यांला अटक केली आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी साधू थिरूमलाई स्वामी मुलगूंडीमध्ये असतो. त्याची मुलगी चीनमध्ये मेडिकलचं शिक्षण घेत आहे. तो तिच्या शिक्षणासाठीच लोनचं घेण्यासाठी सिटी यूनियन बॅंकेत गेला होता. 

बॅंक अधिकाऱ्यांनी साधूला लोनच्या बदल्यात संपत्तीची कागदपत्रे मागितली. यावर साधू म्हणाला की, जर बॅंकेला पैसा व्याजासोबत परत मिळणार आहे तर ते संपत्तीची कागदपत्रे का मागत आहेत?

बॅंक कर्मचाऱ्यांनी साधूला लोन देण्यास नकार दिला. ज्यानंतर तो त्याच्या घरी परत गेला. साधूने घरी जाऊन आपली रायफल घेतली आणि पुन्हा त्याच बॅंकेत आला. तिथे बसून साधूने धुम्रपान केलं आणि कर्मचाऱ्यांना धमकावणं सुरू केलं. 

साधू बॅंक कर्मचाऱ्यांना म्हणाला की, त्याला बॅंकेने लोन देण्यास नकार दिला म्हणून तो बॅंक लुटण्यासाठी आला आहे. यादरम्यान त्याने त्याच्या फेसबुक पेजवर लाइव्ह स्ट्रीमिंग सुरू केलं. अशात पोलिसांना या घटनेची सूचना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून साधूला अटक केली. सध्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Web Title: Refused loan monk carries rifle into bank threatens employees facebook live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.