साखरपुड्यानंतर लग्नास नकार देत होता, तरुणीने बंदुकीच्या धाकावर जजच्या स्टेनोचे केले अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 05:57 PM2022-07-11T17:57:51+5:302022-07-11T17:58:23+5:30
Kidnapping Case : गुरुवारी रात्री पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले. आरोपींकडून लाल रंगाची जोडा आणि एक पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे.
बिजनौर : बिजनौरमध्ये कोर्टात जात असताना, भरदिवसा, मुलीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे, जो न्यायाधीशाचा स्टेनो आहे, त्याच्यासह भाऊ आणि मित्राचे बंदुकीच्या धाकावर अपहरण केले. आरोपी तरुणीने तरुणाला जबरदस्तीने मंदिरात नेले आणि एका लाल जोडा देखील लग्नासाठी सोबत आणला होता. मंदिरात बळजबरीने लग्न करण्याचा प्रयत्न करताना तीन आरोपींना अटक करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. गुरुवारी रात्री पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले. आरोपींकडून लाल रंगाची जोडा आणि एक पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे.
हा तरुण चांदपूरमध्येच भाड्याने घर घेऊन राहतो. गुरुवारी आपल्या एका मित्रासह बाईकवरून कोर्टात जात असताना बिजनौर-बदायूं महामार्गावरून कारचालकांनी तरुणाचे अपहरण केले. पोलिसांनी रात्री उशिरा नजीबाबाद येथून त्याला ताब्यात घेतले होते. बिजनौरचे एसपी दिनेश सिंह यांनी सांगितले की, मुलीने तिचा भाऊ आणि मित्रासोबत अपहरणाचा कट आखला होता. अपहरण केल्यानंतर त्याला मंदिरात नेण्यात आले. ते जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्यांना अटक केली.
अटक आरोपींनी सांगितले की, आम्ही मिळून स्टेनोच्या अपहरणाचा कट रचला होता. ज्या तरुणीसमोर त्याची एंगेजमेंट निश्चित झाली होती, तिच्याशी आम्हाला त्या तरुणाचे जबरदस्तीने लग्न करायचे होते. आरोपीने सांगितले की, स्टेनोचा साखरपुडा झाला होता. हे लग्न 25 मे रोजी होणार होते. दोघेही मोबाईलवर बोलत असत. एक दिवस दोघांमध्ये मोबाईलवरून वाद झाला. त्यानंतर तरुणाने लग्नास नकार दिला.
मात्र, मुलगी लग्नाच्या आग्रहावर ठाम राहिली. यामुळे तरुणीने हा प्रकार घडवून आणला. एसपीच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी आरोपींकडून दोन पिस्तूल आणि एक रेड वेडिंग ड्रेस जप्त केला आहे. तिघांनाही न्यायालयात हजर केले असता तेथून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.