आपच्या आमदाराविरोधात गुन्हा दाखल; नरसिंहानंद सरस्वती यांना दिली होती धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 08:43 PM2021-04-04T20:43:57+5:302021-04-04T20:44:32+5:30

Registered FIR against AAP MLA : आप आमदाराच्या विरोधात भादंवि कलम १५३अ  आणि ५०६ अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Registered FIR against AAP MLA; Narasimhananda Saraswati had threatened | आपच्या आमदाराविरोधात गुन्हा दाखल; नरसिंहानंद सरस्वती यांना दिली होती धमकी

आपच्या आमदाराविरोधात गुन्हा दाखल; नरसिंहानंद सरस्वती यांना दिली होती धमकी

Next
ठळक मुद्देदिल्ली पोलिसांनी प्रेस क्लबमध्ये केलेल्या वक्तव्याबद्दल यती नरसिंहानंद सरस्वती यांच्याविरूद्ध एफआयआर नोंदविला आहे.

आम आदमी पार्टी (आप) चे आमदार अमानतुल्ला खान यांच्याविरोधात दिल्लीतील संसद पथ पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अमानतुल्ला खानने ट्विटरवरून  यति नरसिंहानंद सरस्वती  यांची मान कापण्याची धमकी देण्याबाबत वक्तव्य केले होते. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदविला आहे. आपआमदाराच्या विरोधात भादंवि कलम १५३अ  आणि ५०६ अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
 

दिल्ली पोलिसांनी प्रेस क्लबमध्ये केलेल्या वक्तव्याबद्दल यती नरसिंहानंद सरस्वती यांच्याविरूद्ध एफआयआर नोंदविला आहे. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी नमूद केले की, प्रेस क्लबमधील कार्यक्रमादरम्यान पैगंबर मोहम्मद यांच्याविरूद्ध अपमानास्पद भाषा वापरणार्‍याचा एक व्हिडिओ सापडला आहे, त्या आधारे कलम १५३ अ आणि २९५ अ  अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला आहे. मुंबईत येती नरसिंहानंद सरस्वती यांच्याविरोधात निंदनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हा देखील पैगंबर मोहम्मद यांच्याविरुद्ध वादग्रस्त विधान केल्याबद्दल दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे, गाझियाबादमधील डासना देवी मंदिरात, यती नरसिंहानंद सरस्वती यांनी एका अल्पवयीन मुस्लिम मुलाला पिण्याच्या पाणी प्यायल्याने मारहाण केल्याचे प्रकरण खूपच चर्चेचा विषय बनला होता.

 

नरसिंहानंद यांच्याविरोधात जामिया नगर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आपचे आमदार  अमानतुल्ला खान यांनी दाखल केली आहे.अशा प्रकारच्या गैरकारभार करणाऱ्यास  तुरूंगात पाठवावे असे आवाहन त्यांनी ट्वीटद्वारे केले आहे. आम्ही प्रत्येक धर्माचा आणि त्यांच्या गुरूंचा आदर करतो आणि कोणालाही कोणत्याही धर्माच्या भावनेला इजा पोहोचवू नये अशी आमची इच्छा आहे, अशा आशयाचे ट्वीट करत एक व्हिडीओ देखील आपचे आमदार अमानतुल्ला खान यांनी जोडला आहे.  

 

Web Title: Registered FIR against AAP MLA; Narasimhananda Saraswati had threatened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.