प्रेयसीच्या तक्रारीवरून दाखल केलेला खटला रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 02:24 AM2018-11-18T02:24:18+5:302018-11-18T02:24:41+5:30

पाच वर्षांनी प्रेमसंबंध संपुष्टात आल्यावर सांताक्रुझ येथील तरूणावर आणि त्याच्या कुटुंबियांवर युवतीने केलेले विनयभंग आणि फसवणुकीचा गुन्हा रद्दबातल करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाचे मुुख्य न्या. रंजन गोगई, न्या. नवीन सिन्हा आणि न्या. कुरीयन जोसेफ यांच्या खंडपीठाने अलिकडेच दिला.

Rejected from the complaint of a lover, the case is canceled | प्रेयसीच्या तक्रारीवरून दाखल केलेला खटला रद्द

प्रेयसीच्या तक्रारीवरून दाखल केलेला खटला रद्द

Next

मुंबई : पाच वर्षांनी प्रेमसंबंध संपुष्टात आल्यावर सांताक्रुझ येथील तरूणावर आणि त्याच्या कुटुंबियांवर युवतीने केलेले विनयभंग आणि फसवणुकीचा गुन्हा रद्दबातल करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाचे मुुख्य न्या. रंजन गोगई, न्या. नवीन सिन्हा आणि न्या. कुरीयन जोसेफ यांच्या खंडपीठाने अलिकडेच दिला.
एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतलेली तक्रारदार युवती आणि जयेंद्र आयरे हे फेसबुक फ्रेंड झाले आणि त्यानंतर ते प्रेमात पडले. आरोपीने आपल्याला आक्षेपार्ह छायाचित्रे आणि मेसेज पाठवल्याचे तिचे म्हणणे होते. डिसेंबर २0१५ मध्ये दोघांचे कुटुंबिय भेटले आणि त्यांनी दोघांचा विवाह करण्याचे ठरवल्याचे तिने म्हटले होते. मात्र एप्रिल २0१६ मध्ये विवाह मोडल्यानंतर युवतीने आयरे आणि त्याच्या कुटुंबियांविरूद्ध तक्रार दाखल केली. वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला रद्दबातल करण्यात यावा, यासाठी आरोपीच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर आरोपीने याबाबत सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. तेथे अ‍ॅड. महेश वासवानी यांनी या प्रकरणी आरोपीतर्फे काम पाहिले.
दोघांचे पाच वर्षे प्रेमसंबंध होते. ते तुटल्यानंतर विनयभंगाचे आरोप करणे उचित नाही. साखरपुड्यासाठी खर्च केलेली रक्कम त्यांना परत करण्यास तयार असल्याचे अ‍ॅड. महेश वासवानी यांनी मांडले. सूड घेण्यासाठी केले जाणारे आरोप अशा निर्णयामुळे थांबतील, असेही ते म्हणाले.

Web Title: Rejected from the complaint of a lover, the case is canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.