फ्रेंड रिक्वेस्ट नाकारल्याने, महिला अन् मुलींना पाठवले अश्लिल फाेटाे, मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 03:17 PM2021-11-08T15:17:33+5:302021-11-08T15:46:10+5:30
Cyber Crime : याप्रकरणी अज्ञाताविराेधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रायगड - इंस्टाग्रामवर फ्रेंड्स ग्रुप तयार करुन, त्यावर अश्लिल मेसेज, फोटो पाठवून अल्पवयीन मुलींसह महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार मुरुडमध्ये घडला आहे. याप्रकरणी अज्ञाताविराेधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१७ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने इंन्स्टाग्राम या सोशल नेटर्किंगचा वापर करुन बोगस इंन्स्टाग्राम अकाऊंट तयार केले. त्यानंतर आराेपीने संबंधीत फिर्यादी महिलेसह अन्य मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.अनाेळखी व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याने फिर्यादी महिलेने
ही फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारली नाही. त्याचप्रमाणे अन्य काही मुलींनीही ती स्विकारली नाही आणि सदरचे अकाऊंट ब्लाॅक केले. त्यामुळे सदर आराेपीने फ्रेंड्स इंन्स्टाग्राम ग्रुप तयार करुन त्यामध्ये फिर्यादीसह अन्य मुलींना त्यांच्या संमतीशिवाय ग्रुपमध्येअॅड केले. सदर ग्रुपवर अश्लिल मेसेज आणि छायाचित्रे त्याने पाठवली. आराेपीने फिर्यादी महिलेसह अन्य पीडित मुलींचा विनयभंग केला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, फिर्यादी महिलेने मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.
दरम्यान, याप्रकरणी अज्ञात आराेपी विराेधात विनयभंग, पोक्सो कायदा आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. सोशल मिडीयाचा वापर करताना सर्वांनीच अधिक सजग राहण्याचे तसेच अनुचित प्रकार घडल्यास तातडीने जवळच्या पोलिस ठाण्याशी संर्पक साधण्याचे आवाहन सायबर सेल विभागाने केले आहे.