रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेला दणका; जिल्हा न्यायालयाने फेटाळला जामीन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 04:19 PM2021-09-22T16:19:03+5:302021-09-22T16:27:54+5:30

Rekha Jare Murder Case :बदनामी होण्याच्या भितीतून बोठे याने सुपारी देऊन ३० नोव्हेंबर २०२० रोजी जरे यांची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

Rekha Jare Massacre: Bala Bothe's bail rejected by District court | रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेला दणका; जिल्हा न्यायालयाने फेटाळला जामीन

रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेला दणका; जिल्हा न्यायालयाने फेटाळला जामीन

Next
ठळक मुद्देखुनाच्या घटनेनंतर अटकेच्या भीतीने शंभरपेक्षा जास्त दिवस तो तेलंगणा राज्यात लपून बसला होता.

अहमदनगर: रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याचा बुधवारी जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला. बोठे याच्यावतीने न्यायालयात ॲड. महेश तवले तर फिर्यादी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकिल ॲड. उमेशचंद्र यादव पाटील व ॲड. सचिन पटेकर यांनी युक्तीवाद केला होता.

बदनामी होण्याच्या भितीतून बोठे याने सुपारी देऊन ३० नोव्हेंबर २०२० रोजी जरे यांची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. बोठे सध्या पारनेर येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामीनासाठी अर्ज केला होता. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर आहे. या गुन्ह्याच्या संदर्भातील सर्व पुरावे पोलिसांनी न्यायालयासमोर आणले आहेत. जामीन मिळाला तर आरोपी फरार
होऊ शकतो तसेच साक्षीदारांवर दबाव आणू शकतो. बोठे याने रेखा जरेंशी वितुष्ट आल्यानंतर कट रचून शांत डोक्याने त्यांची हत्या घडवून आणली आहे. खुनाच्या घटनेनंतर अटकेच्या भीतीने शंभरपेक्षा जास्त दिवस तो तेलंगणा राज्यात लपून बसला होता. आरोपीचे वर्तन लक्षात घेत त्याला जामीन देऊ नये, असा युक्तीवार सरकारी पक्षाच्यावतीने ॲड. यादव यांनी केला होता.

Web Title: Rekha Jare Massacre: Bala Bothe's bail rejected by District court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.