आलोकनाथ यांना दिलासा; न्यायालयाने मंजूर केला अटकपूर्व जामीन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 02:35 PM2019-01-05T14:35:37+5:302019-01-05T14:38:01+5:30
#MeToo या मोहिमेअंतर्गत हे प्रकरण पुढे आले होते. या पार्श्वभूमीवर अटक टाळण्यासाठी आलोकनाथांनी अटकपूर्व जामीन अर्ज दिंडोशी सत्र न्यायालयात दाखल केला होता
मुंबई - सिनेसृष्टी गाजवणारे संस्कारी बाबूजी आलोकनाथ यांच्या अटकपूर्व जामिनावर आज दिंडोशी सत्र न्यायालय सुनावणी पार पडली. न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता ओशिवरा पोलीस आलोकनाथ यांना अटक करू शकत नाहीत.
प्रसिध्द तारा मालिकेच्या लेखिका-निर्मात्या विनता नंदा़ यांच्यावर 20 वर्षांपूर्वी केलेल्या बलात्कारप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली आहे. #MeToo या मोहिमेअंतर्गत हे प्रकरण पुढे आले होते. या पार्श्वभूमीवर अटक टाळण्यासाठी आलोकनाथांनी अटकपूर्व जामीन अर्ज दिंडोशी सत्र न्यायालयात दाखल केला होता. आलोकनाथ यांच्यावर कलम 376 नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. निर्मात्या विनता नंदा यांच्यावरील 20 वर्षांपूर्वीच्या बलात्काराच्या आरोपाप्रकरणी या संपूर्ण प्रकाराची चौकशी करणाऱ्या ओशिवरा पोलिसांनी अनेकवेळा आलोकनाथ यांना समन्स पाठवले होते. मात्र, ते कधीच हजर झाले नाहीत.
आलोकनाथ यांना दिलासा; दिंडोशी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन केला मंजूर
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) January 5, 2019
Writer Vinta Nanda rape case: Dindoshi Sessions Court grants anticipatory bail to Alok Nath. (file pics) pic.twitter.com/CmvZi26qNO
— ANI (@ANI) January 5, 2019