चिदंबरम यांना दिलासा; ५ सप्टेंबरपर्यंत अटक न करण्याचे ईडीला आदेश मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 08:52 PM2019-08-29T20:52:58+5:302019-08-29T20:54:18+5:30
या प्रकरणी येत्या ५ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
नवी दिल्ली - आयएनएक्स मीडियाप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. चिदंबरम यांना येत्या ५ सप्टेंबरपर्यंत अटक न करण्याचे आदेश कोर्टाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दिले आहेत. या प्रकरणी येत्या ५ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
आएनएक्स मीडिया आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पी. चिदंबरम यांची चौकशी करण्यासाठी त्यांना अटक करण्याची मुभा देण्यासाठी ईडीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, कोर्टाने चिदंबरम यांना ५ सप्टेंबरपर्यंत दिलासा देत त्यांच्या अटकेला ईडीला मनाई केली आहे. सध्या चिदंबरम हे सीबीआय कोठडीत आहेत. दिल्लीच्या विशेष सीबीआय कोर्टाने सोमवारी चिदंबरम यांची सीबीआय कोठडी ३० ऑगस्टपर्यंत वाढवली. चिदंबरम यांची लाय डिटेक्टर टेस्ट करण्याचाही सीबीआयचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.