दया नायक यांना दिलासा; बदलीच्या आदेशाला मॅटने दिली स्थगिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 06:45 PM2021-05-12T18:45:51+5:302021-05-12T18:46:40+5:30

Daya Nayak Transferred : दया नायक यांच्यासह सहा पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. 

Relief to Daya Nayak; MAT gives stay to the transfer order | दया नायक यांना दिलासा; बदलीच्या आदेशाला मॅटने दिली स्थगिती 

दया नायक यांना दिलासा; बदलीच्या आदेशाला मॅटने दिली स्थगिती 

googlenewsNext
ठळक मुद्देदया नायक यांच्या राज्य पोलीस महासंचालकांच्या ६ मे रोजीच्या बदलीच्या आदेशाला मॅटने स्थगिती दिली असल्याने दिलासा मिळाला आहे.

चकमकफेम पोलीस अधिकारी दया नायक यांची मुंबई एटीएसमधून थेट गोंदियामध्ये बदली करण्यात आली होती. दया नायक यांच्या राज्य पोलीस महासंचालकांच्या ६ मे रोजीच्या बदलीच्या आदेशाला मॅटने स्थगिती दिली असल्याने दिलासा मिळाला आहे. दया नायक यांच्यासह सहा पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. 

ठाण्यातील खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक राजकुमार कोथमिरे व दहशतवादविरोधी पथकातील निरीक्षक दया नायक यांची गुरुवारी तडकाफडकी बदली करण्यात आली.  कोथमिरे यांची गडचिरोलीला, तर नायक यांची गोदियाला उचलबांगडी करण्यात आली होती. पोलीस मुख्यालयातून ६ मे रोजी त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले असून त्यांना तातडीने कार्यमुक्त करण्याची सूचना घटकप्रमुखांना करण्यात आल्या होत्या.

संजय पांडे यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक पदाची धुरा सांभाळल्यापासून वादग्रस्त ठरलेले अधिकारी तसेच एकाच ठिकाणी ठिय्या मांडून असलेल्या अधिकाऱ्यांवरही कार्यवाहीचा बडगा उगारला आहे. सोमवारी पाच पोलीस निरीक्षकांची विदर्भ व मराठवाड्यात बदली करण्यात आली होती. कोथमिरे यांच्याबद्दल अनेक तक्रारी गृहमंत्री, पोलीस महासंचालक कार्यालयात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांची गडचिरोलीला वाचक शाखेत बदली करण्यात आल्याचे समजते. राज्य सरकारच्या रडारवर असलेल्या अप्पर महासंचालक देवेन भारती यांच्या खास मर्जीतील समजल्या जाणाऱ्या दया नायक यांची गोंदिया जिल्ह्यात जात पडताळणी प्रमाणपत्र समितीत तडकाफडकी बदली केली होती. महासंचालकांच्यावतीने अप्पर महासंचालक (आस्थापना) के. के. सरंगल यांनी बदल्यांबाबतचे आदेश जारी केले होते.

 

 

Web Title: Relief to Daya Nayak; MAT gives stay to the transfer order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.