रेमडेसिविरचा काळाबाजार, ३ नर्स अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 11:19 AM2021-05-15T11:19:40+5:302021-05-15T11:20:37+5:30
शहरातील एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या महिला नर्स सिडकोतील मेडिकल दुकानात काम करणाऱ्या युवकाच्या मध्यस्थीने रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्या बाजारात वाढीव किमतीने विक्री करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांना मिळाली होती.
पंचवटी : कोरोनाबाधित रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्याबाजारात विक्री करणाऱ्या तीन नर्ससह औषधांच्या दुकानातील एका कर्मचाऱ्यास पोलिसांनी गुरुवारी रात्री ताब्यात घेतले. दोन इंजेक्शन ५४ हजार रुपयांना विकताना त्यांना अटक करण्यात आली. या चौघांनाही पोलिसांनी न्यायालयात हजर केले असून न्यायालयाने चार दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
शहरातील एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या महिला नर्स सिडकोतील मेडिकल दुकानात काम करणाऱ्या युवकाच्या मध्यस्थीने रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्या बाजारात वाढीव किमतीने विक्री करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांना मिळाली होती. यावेळी सापळा लावत जागृती शार्दूल, श्रुती उबाळे या दोघींना रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांची चौकशी केली असता त्यांना स्नेहल पगारे व कामेश बच्छाव हे इंजेक्शन उपलब्ध करून देत असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी उर्वरित दोघांनाही अटक केली.