धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 11:33 AM2024-11-27T11:33:17+5:302024-11-27T11:34:00+5:30

पोलिसांनी १९० कोटींची सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीतील ११ जणांना अटक करण्यात आली.

rented house foreign connections and rs190 crore scam story of cyber criminals caught in azamgarh | धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश

फोटो - आजतक

आझमगड पोलिसांनी १९० कोटींची सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीतील ११ जणांना अटक करण्यात आली असून ते देशाच्या विविध भागातील रहिवासी आहेत. त्यांचं कनेक्शन हे परदेशातही जोडलेलं आहेत. पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल फोन, लॅपटॉप, रोख रक्कम आणि इतर डिजिटल उपकरणं जप्त केली आहेत.

आझमगडमधील कोतवाली भागात एका घरात बनावट कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सायबर गुन्हेगारांकडून हे कॉल सेंटर २४ तास शिफ्टनुसार चालवलं जात होतं. हे गुन्हेगार व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि बनावट ॲप्सच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधायचे आणि आमिष दाखवून त्यांची फसवणूक करायचे.

हे लोक छोट्या योजना आणि गेमिंग ॲप्सच्या माध्यमातून लोकांना पैसे गुंतवण्यास सांगायचे. मोठी रक्कम जमा झाल्यावर ॲपचा आयडी बंद करण्यात आला होता. आझमगडचे एसपी हेमराज मीणा यांनी सांगितलं की, अनेक दिवसांपासून सायबर क्राईमच्या तक्रारी येत होत्या. ऑनलाइन गेमिंग आणि बनावट ॲप्सच्या माध्यमातून लोकांची फसवणूक केली जात होती. पोलिसांनी या तक्रारींचा कसून तपास करून आरोपींना अटक करण्यात यश मिळविलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी भाड्याच्या घरात कॉल सेंटर चालवत होते. त्यांच्याकडून १७१ बँक खाती, शेकडो मोबाईल फोन, लॅपटॉप आणि मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. त्यांचं फसवणुकीचं जाळं देशाच्या विविध भागात तसेच परदेशात पसरलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

या टोळीने आंतरराष्ट्रीय स्तरावर फसवणुकीचं जाळं पसरवल्याचंही पोलीस तपासात उघड झालं आहे. बनावट ॲप्स आणि ऑनलाइन गेमिंगद्वारे लोकांची फसवणूक केली जाते. एसपी आझमगड हेमराज मीना यांनी सांगितलं की, ही टोळी अतिशय संघटित पद्धतीने काम करत होती. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात डिजिटल उपकरणं आणि बँक खाती जप्त करण्यात आली आहेत. या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.

आरोपींकडून रोख रक्कम, १७१ बँक खाते तपशील, मोबाईल, लॅपटॉप आणि इतर डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. टोळीतील इतर सदस्य आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय कॉन्टॅक्ट शोधले जात असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
 

Web Title: rented house foreign connections and rs190 crore scam story of cyber criminals caught in azamgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.