सैराटची पुनरावृत्ती! प्रियकरासोबत लग्न करण्याचा हट्ट नडला; आई-वडिलांनीच केली गर्भवती मुलीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 08:13 PM2020-06-09T20:13:29+5:302020-06-09T20:18:51+5:30

या गावात एका मुलाशी लग्न करण्याचा २० वर्षीय मुलीने पालकांकडे हट्ट धरला. त्यामुळे संतापलेल्या आई-वडिलांनीच रागाच्या भरात मुलीची हत्या केली.

Repetition of Sairat! insisted on marrying a lover; The parents killed the pregnant girl | सैराटची पुनरावृत्ती! प्रियकरासोबत लग्न करण्याचा हट्ट नडला; आई-वडिलांनीच केली गर्भवती मुलीची हत्या

सैराटची पुनरावृत्ती! प्रियकरासोबत लग्न करण्याचा हट्ट नडला; आई-वडिलांनीच केली गर्भवती मुलीची हत्या

Next
ठळक मुद्देआंध्र प्रदेशातील कुरनूल शहरातील सेंट जोसेफ कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिकणाऱ्या मुलीचे दुसऱ्या जातीतल्या मुलाशी प्रेमप्रकरण होते. पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३०२ अन्वये पालकांविरोधात गुन्हा दाखल केला असून शवविच्छेदन अहवालात मुलीचा मृत्यू श्वास कोंडल्याने झाला असल्याचे स्पष्ट झाले. 

हैदराबाद - तेलंगणामध्ये ऑनर किलिंगचा असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहेत. तेलंगणा येथील जोगुलंबा गडवाल जिल्ह्यातील काळुकुंटला गावातील ही घटना आहे. या गावात एका मुलाशी लग्न करण्याचा २० वर्षीय मुलीने पालकांकडे हट्ट धरला. त्यामुळे संतापलेल्या आई-वडिलांनीच रागाच्या भरात मुलीची हत्या केली.

आंध्र प्रदेशातील कुरनूल शहरातील सेंट जोसेफ कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिकणाऱ्या मुलीचे दुसऱ्या जातीतल्या मुलाशी प्रेमप्रकरण होते. कोडुमुरु येथे राहणारा हा मुलगा होता. काही दिवसांनी मुलीची तब्येत बिघडल्यामुळे तिला तिच्या पालकांनी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी २० वर्षीय मुलगी १३ आठवड्यांची गर्भवती असल्याचं कळल्यानंतर आई-वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. पालकांनी मुलीला गर्भपात करण्यास सांगितले. मात्र, मुलीने नकार देत प्रियकरासोबत लग्न करण्याचा आग्रह धरला होता.

त्यानंतर मुलीच्या पालकांनी तिच्या लग्नाला तात्पुरता होकार दिला. नंतर तिला रुग्णालयातून घरी घेऊन गेले आणि त्याचदिवशी मुलीची ती झोपलेली असताना तोंडावर उशी दाबून हत्या केली. दरम्यान, रविवारी पालकांनी आपल्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने नैसर्गिक मृत्यू झाल्याचं गावकऱ्यांना सांगितलं. मात्र, गावकऱ्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. ग्रामसचिवांना हत्येचा संशय आला, म्हणून त्यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात ऑनर किलिंगची घटना समोर आली. पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३०२ अन्वये पालकांविरोधात गुन्हा दाखल केला असून शवविच्छेदन अहवालात मुलीचा मृत्यू श्वास कोंडल्याने झाला असल्याचे स्पष्ट झाले. 

 

खळबळजनक! गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षा रक्षकाचे अपहरण करून केली लूटमार

 

नवऱ्याच्या गर्भवती प्रेयसीला घराबाहेर बोलावलं अन् गोळीच झाडली... व्हिडीओ व्हायरल

 

अर्नब गोस्वामींच्या अडचणींत वाढ; मुंबई पोलिसांकडून उद्या पुन्हा चौकशी

 

खळबळजनक! रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या ८० वर्षीय कोरोना रुग्णाचा मृतदेह सापडला

Web Title: Repetition of Sairat! insisted on marrying a lover; The parents killed the pregnant girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.