कंत्राटदारांच्या तावडीतून पाच बालमजुरांची सुटका

By निलेश जोशी | Published: September 10, 2022 08:28 PM2022-09-10T20:28:27+5:302022-09-10T20:29:18+5:30

मध्यप्रदेशातून एक वर्षाच्याच्या करारावर मेंढी चराईसाठी होते आणले

Rescue of five child laborers from the custody of contractors in Buldhana | कंत्राटदारांच्या तावडीतून पाच बालमजुरांची सुटका

कंत्राटदारांच्या तावडीतून पाच बालमजुरांची सुटका

googlenewsNext

बुलढाणा: एक वर्षाच्या करारावर कंत्राटदाराने मध्यप्रदेशातून मेंढी चराईसाठी आणलेल्या ५ बालमजुरांची बुलढाणा येतील चाईल्ड लाईने मेंढपाळांच्या तावडीतून सुटका केली आहे. दरम्यान या मुलांची बालगृहात रवानगी करण्यात आली आहे.ही कारवाई ९ सप्टेंबर रोजी सायंकाळ दरम्यान करण्यात आली.

बुलढाणा येथील चाईल्ड लाईन मुंबई येथील चाईल्ड लाईनकडून अनुषंगीक माहिती मिळाली होती. त्यानुषंगाने बुलढाणा चाईल्ड लाईनने शहरातील वृंदावन नगर परिसरात तथा भगीरथ खत कारखान्याच्या परिसरात शोध घेतला असता ५ ते ६ वर्षाची मुले ठेकेदाराकडून मेंढी चराईसाठी बालमजूर म्हणून राबविण्यात येत होते. एक वर्षाच्या विविध स्वरुपाच्या आर्थिक करारावर हे काम केल्या जात असल्याचेही चाईल्ड लाईनच्या निदर्शनास आले. त्यामुळे बुलढाणा चाईल्ड लाईनचे समन्वयक शेख साहेप व सहकाऱ्यांनी चाईल्ड लाईनच्या संचालक जिजा चांदेकर राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक सविस्तर माहिती घेतली. सोबतच या प्रकरणाची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आणि बुलढाणा शहर पोलिसांना दिली. त्यांच्या समवेत घटनास्थळी जात पाचही बालमजुरांना ताब्यात घेत त्यांची बालगृहात रवानगी करण्यात आली. संरक्षणाच्या दृष्टीकोणातून ही रवानगी करण्यात आली आहे. बालकल्याण समितीनेही या बालकांचे समुपदेशन करून त्यांचे बयान नोंदविलेले आहेत. मेंढी चराई कंत्राटदारांना बुलढाणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात बाल अधिनियम कायदा २०१५ नुसार बुलढाणा शहर पोलिस समितीच्या आदेशानुसार कारवाई करत आहेत.

मुलांच्या कुटुंबियांचे बयान घेणार
यासंदर्भात बाल कल्याण समिती आता मध्यप्रदेशात जाऊन या मुलांच्या कुटुंबियांचे जबाब घेणार आहे. सोबतच त्यांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणात मध्यप्रदेशातच गुन्हा दाखल होईल, असे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी सांगितले.

Web Title: Rescue of five child laborers from the custody of contractors in Buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.