'सागर संपदा' या संशोधकांच्या जहाजाला लागली भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 02:21 PM2019-03-16T14:21:39+5:302019-03-16T14:23:36+5:30
सागर संपदा या जहाजामध्ये १६ शास्त्रज्ञ आणि ३६ क्रू मेम्बर्स होते.
कर्नाटक - सागर संपदा या संशोधकांच्या जहाजाला काल उशिरा रात्री अचानक आग लागली. या भीषण आगीवर तटरक्षक दलाच्या विक्रम आणि सुजय या दोन जहाजांच्या मदतीने नियंत्रण मिळवता आलं. सागर संपदा या जहाजामध्ये १६ शास्त्रज्ञ आणि ३६ क्रू मेम्बर्स होते. सर्वजण सुखरूप असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सागर संपदा जहाजाला लागलेली आग विजल्यानंतर जहाज मंगळुरु येथे बंदरावर नेण्यात आलं. हे जहाज समुद्री जीवांविषयी संशोधन करत असून त्यासाठीच ते रवाना करण्यात आलं होतं. ही आग कशामुळे आणि का लागली ? याची सखोल चौकशी तटरक्षक दल करत आहे. मात्र, सुदैवाने या भीषण आगीत कोणीही जखमी झालेलं नाही.
'सागर संपदा' या संशोधकांच्या जहाजाला लागली भीषण आग; सर्व सुखरूप pic.twitter.com/UcyxFn6iQM
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) March 16, 2019
During late hrs on 15 Mar 19, #SCI Research Vessel Sagar Sampada reported fire onboard at sea @IndiaCoastGuard Ships Sujay & Vikram engaged in fire fighting ops. Safety of 36 crew & 16 scientist onboard ascertained. Vessel being escorted to New Mangalore harbour.@DefenceMinIndiapic.twitter.com/OBS9OYiaqH
— Indian Coast Guard (@IndiaCoastGuard) March 16, 2019