बँकेचा फाेन नंबर ‘गुगल’ करणे पडले पाच लाखांना; निवृत्त लष्करी कर्मचाऱ्याला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 10:48 AM2022-01-18T10:48:18+5:302022-01-18T10:53:18+5:30

अनोळखी नंबरवरून काॅल करून एका व्यक्तीने त्यांना चार लाख ८६ हजार ९३९ रुपयांना गंडा घातला आहे.

retired army officer lost 5 lakhs after he googles five lakh rupees | बँकेचा फाेन नंबर ‘गुगल’ करणे पडले पाच लाखांना; निवृत्त लष्करी कर्मचाऱ्याला गंडा

बँकेचा फाेन नंबर ‘गुगल’ करणे पडले पाच लाखांना; निवृत्त लष्करी कर्मचाऱ्याला गंडा

Next

अंबरनाथ : गुगलवरून बँकेचा नंबर शाेधून त्यावरून काॅल करणे बदलापूर शहरातील निवृत्त लष्करी कर्मचाऱ्याला महागात पडले आहे. त्यानंतर अनोळखी नंबरवरून काॅल करून एका व्यक्तीने त्यांना चार लाख ८६ हजार ९३९ रुपयांना गंडा घातला आहे. हा प्रकार १६ जानेवारीला घडला आहे. याबाबत बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

यादवनगर परिसरात राहणारे निवृत्त लष्करी कर्मचारी प्रमोद मर्चंडे यांचे एसबीआय बँकेचे ऑनलाइन बँकिंग ॲप चालत नसल्याने त्यांनी गुगलवर शोध घेऊन कस्टमर केअरचा संपर्क क्रमांक मिळवला. त्यानंतर त्यांनी टोलफ्री नंबरवर कॉल करून बँकेचे ऑनलाइन ॲप चालू होत नसल्याची माहिती दिली. ही माहिती दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना कॉल आला. त्यावेळी त्यांच्याकडून सर्व अकाउंटचे डिटेल्स घेतले. त्यानंतर त्यांना एनी डेस्क हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. मर्चंडे यांनी हे अप्लिकेशन डाउनलोड केल्यावर कॉल केलेल्या अनाेळखी व्यक्तींनी बँकेचा रजिस्टर मोबाइल नंबर बदलला. त्यानंतर त्यांच्या खात्यातून चार लाख ८६ हजार ९३९ रुपये काढून घेतले.

मेसेजकडे दुर्लक्ष भाेवले
नंबर बदलल्याचा मेसेजही मर्चंडे यांना आला होता. बँकेचा कर्मचारी असल्याने त्यांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. तीन दिवसांनंतर बँक बॅलन्स चेक केल्यानंतर खात्यावर अठराशे रुपये असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी बँकेत संपर्क साधला असता त्यांच्याकडून फसवणूक झाल्याचा बँकेने फॉर्म भरून घेत त्यांना पोलिसांत तक्रार करण्यास सांगितले.

Web Title: retired army officer lost 5 lakhs after he googles five lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.