Pune Crime News: पत्नीवर गोळी झाडून निवृत्त कर्नलने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 11:45 PM2022-04-20T23:45:09+5:302022-04-20T23:45:25+5:30
पोलिसांनी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा दोघेही मृतावस्थेत आढळून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सेवानिृत्त कर्नलने आपल्या पत्नीवर डबल बोअरच्या बंदुकीतून गोळी झाडून तिचा खून केला व त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली.
निवृत्त कर्नल नारायणसिंग बोरा (वय ७५), चंपा बोरा (वय ६३, रा सिटाडेल सोसायटी, बी. टी. कवडे रोड, घोरपडी) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले की, निवृत्त कर्नल बोरा हे पत्नीसह रहात होते. त्यांचा एक मुलगा व जावई दोघेही लष्करात आहेत. दुसरा मुलगा मुंबईत रहातो. मुलगी दिल्लीत स्थायिक आहेत. त्यांचा मुलगा वडिलांना फोन करत होता. परंतु, ते फोन उचलत नसल्याने त्याने आपल्या मित्राला घरी पाठविले. मात्र, ते दरवाजा उघडत नसल्याने या मित्राने ही बाब सोसायटीच्या सेक्रेटरीला कळविली. त्याने मुंढवा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा दोघेही मृतावस्थेत आढळून आले. आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. मुंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.