सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकाऱ्यास लुटले; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
By भगवान वानखेडे | Updated: March 13, 2023 17:59 IST2023-03-13T17:59:10+5:302023-03-13T17:59:32+5:30
याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकाऱ्यास लुटले; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
भगवान वानखेडे : बुलढाणा
बुलढाणा : शहरातील शिक्षक कॉलनी भागात राहणाऱ्या एका ६९ वर्षीय सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकाऱ्याचा मोबाइल हिसकावून अज्ञात चोरट्यांनी पळ काढला. ही घटना ११ मार्च रोजी दुपारी पावणे दोन वाजता नगरपालिका शाळासमोर घडली.याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी रामभाऊ मागाजी जुमडे (६९,रा.शिक्षक कॉलनी) हे ११ मार्च रोजी दुपारी जयस्तंभ चौकाकडून कोर्टाकडे जाणाऱ्या जिल्हा परिषद कार्यालयामागील रोडने जात असताना नगरपालिका शाळेसमोर थांबले असता काही युवकांनी त्यांच्या खिशातील पाच हजार रुपये किंमतीचा मोबाइल हिसकावून घेऊन पळ काढला. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास रमेश कानडजे करीत आहेत.