भोरमधील फार्महाऊसवर स्थानिक शेतकऱ्यांवर सेवानिवृत्त मेजरकडून गोळीबार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 11:43 PM2024-05-15T23:43:04+5:302024-05-16T00:29:22+5:30

जागेच्या वादातून कर्नल सिंग यांनी संबंधित शेतकऱ्यांना घाबरवण्याकरीता हवेत दोन फायर केले.

Retired Major firing on local farmers at farmhouse at dawn | भोरमधील फार्महाऊसवर स्थानिक शेतकऱ्यांवर सेवानिवृत्त मेजरकडून गोळीबार 

भोरमधील फार्महाऊसवर स्थानिक शेतकऱ्यांवर सेवानिवृत्त मेजरकडून गोळीबार 

भोर- भोर तालुक्यातील वेळवंड खो-यातील पसुरे येथील फार्महाऊसवर स्थानिक शेतकऱ्यावर सेवानिवृत्त मेजरने गोळीबार केल्याची घटना आज दुपारनंतर घडली. यात कोणीही जखमी झालेले नाही. मात्र, शेतकरी भयभित झाले आहेत. भोर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. 

भोर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पसुरेतील स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर अनधिकृत अतिक्रमण करून विजेचे खांब उभे केले होते. शेतकरी विचारणा करणेसाठी गेले असता सेवानिवृत्त मेजर एच.पी.सिंग यांनी स्थानिक शेतकऱ्यांवर गोळीबार करून धमकवण्याचा प्रयत्न केला. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. सदर घटनेमुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. बिऱ्हामणेवाडीतील अशोक गेणबा बिऱ्हामणे, प्रकाश तुकाराम शेलार, शंकर दिनकर बिऱ्हामणे, सोनबा कोंडीबा बिऱ्हामणे, चंद्रकांत कुरुंगावडे व कर्नवडीतील पवार हे शेतकरी जाब विचारण्यासाठी गेले होते. 

जागेच्या वादातून कर्नल सिंग यांनी संबंधित शेतकऱ्यांना घाबरवण्याकरीता हवेत दोन फायर केले. कर्नल व शेतकरी यांच्या वादावादी झाल्याचे येथील गावकऱ्यांकडून सांगण्यात आले. या झालेल्या घटनेने वेळवंड खोऱ्यात फार्महाऊस,रेस्टॉरंट,हॉटेलवाले, पार्टीवाल्यांची दहशत निर्माण झाली आहे. परवाना असलेली सेल्फ डिफेन्स करीता दिलेली बंदूक मेजर सिंग यांनी लोकांना घाबरवण्या करीता वापरली असल्याचे लोकांकडून सांगण्यात आले. 

Web Title: Retired Major firing on local farmers at farmhouse at dawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.