खळबळजनक! नाल्यात सापडला निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह, ३ दिवसांपासून होते बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 06:08 PM2022-06-20T18:08:31+5:302022-06-20T18:45:14+5:30
Retired Police Officer Found Dead : मृताचा मुलगा किशोर हा देखील पोलीस खात्यात असून तो नेहरू नगर पोलीस ठाण्यात सहायक उपनिरीक्षक (एएसआय) म्हणून कार्यरत आहे.
मुंबई : मुलुंड पूर्व येथील एका नाल्यात 87 वर्षीय सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाचा मृतदेह रविवारी सकाळी आढळून आला. तो १५ जूनपासून बेपत्ता होता आणि नाल्याच्या साफसफाईदरम्यान त्याचा मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. मृताचा मुलगा किशोर हा देखील पोलीस खात्यात असून तो नेहरू नगर पोलीस ठाण्यात सहायक उपनिरीक्षक (एएसआय) म्हणून कार्यरत आहे.
मृत शिवदास कुमावत हे मुलुंड पूर्वेकडील म्हाडा कॉलनीत असलेल्या साईराम अपार्टमेंटमध्ये मुलासह कुटुंबासह राहत होते. वृद्धापकाळामुळे कुमावत यांची स्मरणशक्ती कमी झाली होती असून १५ जून रोजी ते फिरायला घरातून निघाले. मात्र, परत आलेच नाही, असे पोलिसांनी सांगितले. मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची (एडीआर) नोंद करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीचे जेवण करून कुमावत घरातून फिरायला निघाले आणि रस्ता चुकला. दुसरा रस्ता पकडत ते परिसरातील महालक्ष्मी टॉवरवर पोहोचला. कुठे फूटपाथवरून चालत असताना कुमावत उघड्या नाल्यात पडले असावेत. प्राथमिक तपासात कुमावत यांचा बुडून मृत्यू झाला असावा, असे पोलिसांना आढळून आले. मात्र हा अहवाल येईपर्यंत पुढील माहितीच्या प्रतीक्षेत पोलीस आहे.
कुमावत यांच्या नातेवाईकाने सांगितले की, जेवण करून ते रोज फिरायला जायचे, मात्र १५ जूनला ते घरी परतलेच नाहीत. आम्ही संपूर्ण परिसराचे सीसीटीव्ही तपासले. नवघर पोलिसांनीही आम्हाला मदत केली, मात्र त्यांचा काहीही पत्ता लागला नाही. "शिवदास कुमावत दिवसेंदिवस त्यांची स्मरणशक्ती गमावत होते आणि आम्हाला वाटते की, ते रस्ता चुकले आणि दुसर्या ठिकाणी गेले, जिथे त्यांचा नाल्यात पडून आपला जीव गेला असावा," असे पुढे नातेवाईक म्हणाले.
नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील कांबळे (नवघर पोलिस स्टेशन) यांनी सांगितले की, रविवारी सकाळी नाल्याच्या साफसफाईदरम्यान एका व्यक्तीचा तरंगता मृतदेह आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.