गर्भवती राहिल्यानंतर अल्पवयीन मुलीवर तोंड दाबून लैंगिक अत्याचार केल्याची बाब उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 01:55 PM2021-02-11T13:55:33+5:302021-02-11T13:56:05+5:30
Sexual abuse of a minor girl : गुरुवारी हा गुन्हा रामानंद नगर पोलिसांकडे वर्ग झाला आहे.
जळगाव : दुकानावर दूध घ्यायला जात असलेल्या पंधरा वर्षीय मुलीला अंधाराचा गैरफायदा घेत एका व्यक्तीने तोंड दाबून रस्त्याच्या बाजुला नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडिता गर्भवती राहिल्याने ही बोंब फुटली असून याप्रकरणी बालकल्याण समितीने पीडिताचा जबाब नोंदविला असून अज्ञात व्यक्तीविरुध्द बलात्कार व बलात्कार व लैगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ३,८,५ (ज) ६,७,९ अन्वये तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुरुवारी हा गुन्हा रामानंद नगर पोलिसांकडे वर्ग झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात रात्री ९.३० वाजता पीडिता दुकानावर दूध घ्यायला जात असताना एका अज्ञात व्यक्तीने तिचे तोंड दाबून रस्त्याच्याकडेला ओढत नेले. नंतर तेथून पिंप्राळा शिवारातील गिरणा पंपीगकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून असलेल्या राजीव गांधी नगराच्या मोकळ्या जागेत नेऊन अत्याचार केला. या घटनेनंतर पीडिता कमालीची घाबरली होती. कुटुंबानेही भीती व बदनामीपोटी तक्रार दिली नाही. बुधवारी पीडितेने कौटुंबिक वादातून फिनाईल प्राशन केले. तिला शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान, पीडिता तीन महिन्याची गर्भवती असल्याचा प्रकार उघडकीस आला.